मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यात PFI च्या घोषणाबाजीवर नितेश राणे म्हणाले, राज्यात हिंदुत्त्ववादी गृहमंत्री असल्याने...

पुण्यात PFI च्या घोषणाबाजीवर नितेश राणे म्हणाले, राज्यात हिंदुत्त्ववादी गृहमंत्री असल्याने...

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 24, 2022 03:47 PM IST

Nitesh Rane: महाराष्ट्रात पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावले तर ते काय परत सुखरुप घरी जाणार नाहीत याची काळजी आम्ही घेऊ असा इशारासुद्धा नितेश राणे यांनी दिला.

आमदार नितेश राणे
आमदार नितेश राणे (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Nitesh Rane: पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अनेक नेत्यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर एनआयए आणि ईडीने छापे टाकून कारवाई केली. याविरोधात काल देशात विविध ठिकाणी पीएफआयकडून बंद पुकारण्यात आला होता. यावेळीच पुण्यात पीएफआयच्या कार्यकर्त्यांकडून पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. याबाबत भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "पुण्यात पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले, आमच्या देशात राहून देशाविरोधात घोषणा देत असतील तर पोलिसांनी ही हिंमत तोडण्याचं काम करावं."

राज्यात हिंदुत्त्ववादी सरकार आहे आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. हिंदुत्त्ववादी गृहमंत्री असल्याने पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी अपेक्षा आहे. यापुढे महाराष्ट्रात पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावले तर ते काय परत सुखरुप घरी जाणार नाहीत याची काळजी आम्ही घेऊ असा इशारासुद्धा नितेश राणे यांनी दिला.

पीएफआयकडून देण्यात आलेल्या घोषणांविरोधात नितेश राणे रस्त्यावर उतरणार का? असे विचारले असता त्यांनी म्हटलं की, आज आमचं सरकार राज्यात आहे, फडणवीस स्वत: यावर लक्ष ठेवून आहेत. गरज भासली तर रस्त्यावर उतरू आणि घरातही घुसू. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात असतील तर राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठा प्रश्न निर्माण होतो. पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे. भविष्यात तोंडातून पाकिस्तान नावच येता कामा नये अशी कारवाई करावी."

…तर सी लिंकमध्ये उडी मारतील
शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांना न्यायालयाने परवानगी दिली. त्यानंतर मातोश्रीबाहेर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणेंनी म्हटलं की, आश्चर्य वाटतं की मुळात शिवाजी पार्कसाठी भांडायला लागतं हे उद्धव ठाकरेंचं अपयश नाही का? साधं एक मैदान तर जिंकलंय. न्यायालयाच्या निर्णयाचा आदरच करावा लागतो. न्यायालयाला जे योग्य वाटतं तो निर्णय दिला. त्यावर बोलण्याची गरज नाही. आदित्यचं मुलीशी लग्न ठरलंय का तुम्ही इतकं नाचताय? आम्ही जेव्हा जांबोरी मैदान मिळवलं तेव्हा पूर्ण भाजपने नाचून दाखवायला होतं. साधं मैदान जिंकल्यावर एवढं नाचतायत, आदित्यच्या टायमाला सीलिंकमध्ये उडी मारतील.

श्रीकांत शिंदे बोललेत आता शितल म्हात्रेही भूमिका मांडतील
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेले असताना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून श्रीकांत शिंदे कारभार करतात असा आरोप राष्ट्रवादीने केला होता. त्यानंतर शिंदे गटातील नेत्या शितल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळे यांचा एक फोटो शेअर केला. हा फोटो मॉर्फ असल्याचं राष्ट्रवादीने स्पष्ट केलं. यासंदर्भात विचारले असता नितेश राणे यांनी म्हणाले की, "मी या विषयावर माहिती घेतली नाहीय. श्रीकांत शिंदे यांनी भूमिका मांडली आहे, म्हात्रे मॅडमसुद्धा याबद्दल बोलतील, मी काही सांगायची गरज नाही."

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या