पंकजा मुंडेंनी रुग्णालयात जाऊन घेतली धनंजय मुंडेंची भेट, प्रकृतीची विचारपूस
pankaja munde meet Dhananjay munde : राजकीय वैर बाजुला ठेऊन भाजप नेत्या अपघातग्रस्त आपल्या भावाला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात गेल्या होत्या.
राष्ट्रवादीचे नेते धनजंय मुंडे व भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे नात्याने बहीण-भाऊ असले तरी त्यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. परळी मतदारसंघातील त्यांच्यातील लढती राज्यात लक्षवेधक लढत असते. हे दोन भाऊ-बहीण वेगवेगळ्या पक्षात असून राजकारणात एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र आज राजकीय वैर बाजुला ठेऊन पंकजा मुंडे यांनी थेट ब्रीच कँडी रुग्णालय गाठले व धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. याचे फोटो व्हायरल होत आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीचा ३ जानेवारी रोजी अपघात झाला होता. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे.
धनंजय मुंडे यांच्या गाडीला ३ जानेवारी रोजीरात्री १२ वाजण्याच्या सुमारास परळीमध्ये अपघात झाला होता. धनंजय मुंडेंच्या कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून तशी माहिती देण्यात आली होती. मतदारसंघातील कार्यक्रम आटोपून रात्री परळीकडे परत येताना हा अपघात झाला होता. चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्यामुळे अपघाताची घटना घडली होती.
संबंधित बातम्या