मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नात्याला काळीमा, बुलढाण्यात ४० वर्षीय मामाचा १० वर्षीय भाचीवर बलात्कार

नात्याला काळीमा, बुलढाण्यात ४० वर्षीय मामाचा १० वर्षीय भाचीवर बलात्कार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 11, 2023 11:25 PM IST

४० वर्षीय नराधमाने आपल्या १० वर्षीच्या चिमुकल्या भाचीला वासनेची शिकार बनवले. या घटनेमुळे खामगाव शहरात खळबळ माजली असून पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात मामा-भाचीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे एका ४० वर्षीय नराधमाने आपल्या १० वर्षीच्या चिमुकल्या भाचीला वासनेची शिकार बनवले. या घटनेमुळे खामगाव शहरात खळबळ माजली असून पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, पुण्यात कामाला असलेला एक ४० वर्षीय तरुण खामगाव येथे बहिणीकडे आला होता. दरम्यान, ८ एप्रिलच्या रात्री त्याने आपल्या १० वर्षीय भाचीला तोंड दाबून बाजूच्या खोलीत उचलून नेले व तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. हे दुष्कृत्य केल्यानंतर तो तेथून पळून गेला. ही घटना पीडित मुलीने तिच्या आईला सांगितली. त्यानंतर पीडितेच्या आईने खामगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. 

पोलिसांनी याप्रकरणी नराधम मामाविरुद्ध भादंवि कलम ३७६ (ए), ३७७, ३७६ (आय), सहकलम ४, ६, ८ पॉक्सो अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. 

दरम्यान,  रात्री शहर पोलिसांच्या डीबी पथकाने पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या नराधम आरोपीस अकोला बायपास येथून अटक केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग