मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Baramati : बारामती हादरले! प्रेमविवाह केला म्हणून आई व भावानं केला मुलीच्या दिरावर जीवघेणा हल्ला

Baramati : बारामती हादरले! प्रेमविवाह केला म्हणून आई व भावानं केला मुलीच्या दिरावर जीवघेणा हल्ला

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Nov 29, 2022 11:57 AM IST

Baramati Crime news: बारामती तालुक्यातील मालेगाव येथे मुलीने प्रेमविवाह केल्याने तिच्या आईंने आणि भावाने मुलीच्या दिरावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेत दीर हा गंभीर जखमी झाला आहे.

Pune crime
Pune crime (HT_PRINT)

पुणे : बारामती तालुक्यातील मालेगाव येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीने प्रेमविवाह केल्याने संतापलेल्या आईने आणि मुलाने मुलीच्या दिरावर प्राणघातक हल्ला केला. येथील कॉलनी लक्ष्मी नगर येथे ही घटना घडली. दोन्ही घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. यामुळे मुलगा आणि मुलगी हे पळून गेले होते. हे कळताच मुलीची आणि आणि भावाने थेट मुलाचे घर गाठत दिरावर हल्ला केला.

सुनिता संजय चव्हाण आणि मयूर संजय चव्हाण असे आरोपी आई आणि मुलाचे नाव आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, मुलगा आणि मुलगी हे पोलिस ठाण्यात हजर झाले असून पोलिसांनी त्यांना संरक्षण दिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळेगाव येथील लक्ष्मी नगर येथे राहणाऱ्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांनी पळून जाऊन लग्न केले. ही बाब मुलीच्या आईला आणि भावाला कळले. त्यांचा राग अनावर झाल्याने, त्यांनी थेट मुलाचे घर गाठले. यावेळी मुलाचा भाऊ पुढे आला. सुनिता संजय चव्हाण, मयूर संजय चव्हाण यांनी मुलाच्या भावाला जाब विचारात मुलगा कुठे आहे, अशी विचारणा केली मात्र ते कुठे आहेत हे माहिती नसल्याचे त्यांची सांगितले.

यावेळी मयूर चव्हाण याने त्याच्या डोक्यात दगड मारला.तसेच त्याला हाताने आणि पायाने मारहाण केली. या घटनेत दीर हा जागेवर बेशुद्ध झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर मुलाच्या घरच्यांनी थेट पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली असून त्यानुसार दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायलयाने दिले आहेत. ही घटना कळल्यावर पळून गेलेले मुलगा आणि मुलगी हे पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचे संगितले आसून तयानुसार त्यांना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग