Weather Today Updates: मॉन्सूनने हुलकावणी दिल्याने तापमानात वाढ झाली आहे. पुढील काही दिवस मॉन्सून येणार नसल्याने सध्या तरी वाढत्या उन्हापासून सुटका होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाही. अरबी समुद्रात आलेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा देखील मॉन्सूनवर परिणाम होणार आहे. यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्रासह आणखी काही राज्यात उष्णतेची लाट येणार आहे. गुरुवारपासून वातावरणातील उष्णतामान वाढणारअसून आज बुधवारी राज्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामुळे बाहेर पडतांना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बिहारमधील काही भाग, पश्चिम बंगाल, पूर्व झारखंड, आंध्र प्रदेश, यानम आणि तेलंगणामधील काही भागांमध्ये ही उष्णतेची लाट येणार आहे. पुढील १० जून पर्यंत ही लाट कायम राहणार आहे. उत्तर प्रदेशात उद्या ८ पासून जूनपासून उष्णतेची लाट कायम राहणार आहे. दरम्यान, केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये पुढील काही दिवस पूर्व मौसमी पावसाची हजेरी राहणार आहे.
पुढील दोन दिवस राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस येण्याची शक्यता आहे. पुणे आणि परिसरात ऊन आणि पावसाचा खेळ पाहायला मिळणार आहे. पुण्यात पुढील काही दिवस संध्याकाळी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगजनज जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि हलक्ट्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
ा सोबतच राज्यातील मुंबई, जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता देखील विभागानं वर्तविली आहे.
दरम्यान, मॉन्सूनची प्रतीक्षा लागली आहे. अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळामुळे केरळ किनारपट्टीवर मान्सून दाखल होण्यास विलंब होणार आहे.