मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Tempo Accident : तब्बल ३८ कामगारांना घेऊन जाणारा टेम्पो दरीत कोसळला; महाबळेश्वरमधील घटना

Tempo Accident : तब्बल ३८ कामगारांना घेऊन जाणारा टेम्पो दरीत कोसळला; महाबळेश्वरमधील घटना

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 14, 2023 12:15 PM IST

Tempo Accident Today : अपघातग्रस्त टेम्पोमध्ये दोन गरोदर महिला आणि मुलंही प्रवास करत होते. त्यानंतर आता घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

Mahabaleshwar Tempo Accident
Mahabaleshwar Tempo Accident (HT)

Mahabaleshwar Tempo Accident : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये ३८ कामगारांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अपघात झाल्यानंतर टेम्पो खोल दरीत कोसळला असून त्यानंतर आता प्रशासनाकडून मदत व बचावकार्य सुरू सुरू करण्यात आलं आहे. महाबळेश्वरमधील या अपघातात बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील बहुतांश कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता जखमी प्रवाशांना उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातात अद्याप कुणाचाही मृत्यू झालेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यातील मुकदेवमध्ये रस्त्यावरील उतारामुळं कामगारांना घेऊन जाणारा टेम्पो खोल दरीत कोसळला. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवाशांना अपघातग्रस्त टेम्पोतून बाहेर काढण्यास सुरुवात केली असून जखमींना रुग्णालयात दाखल केलं जात आहे. बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातून हे सर्व कामगार रस्त्यांच्या कामासाठी महाबळेश्वरमध्ये आले होते. त्यानंतर आता जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

जखमींमध्ये महिलांसह मुलांचाही समावेश...

महाबळेश्वरमध्ये झालेल्या टेम्पो अपघातात सर्व ३८ कामगार जखमी झाले असून त्यात दोन गर्भवती महिलांचाही समावेश आहे. याशिवाय लहान मुलांनाही अपघातामुळं गंभीर मार लागल्याची माहिती आहे. त्यामुळं आता प्रशासनानं सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

IPL_Entry_Point