मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shirur lightning death: शिरूर तालुक्यात वीज पडून १६ वर्षीय तरुणीचा मृत्यू; तर बहीण गंभीर जखमी
Girl Dead due to lightning
Girl Dead due to lightning

Shirur lightning death: शिरूर तालुक्यात वीज पडून १६ वर्षीय तरुणीचा मृत्यू; तर बहीण गंभीर जखमी

29 September 2022, 9:13 ISTNinad Vijayrao Deshmukh

Shirur Girl Dead due to lightning : पुण्यातील शिरूर तालुक्यातील सदलगाव येथे एक वाईट घटना घडली. शेतात काम करत असताना अचानक वीज कोसळल्याने एका १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला तर तिची बहीण गंभीर जखमी झाली आहे.

Shirur lightning death: पणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात अतिशय वाईट घटना घडली आहे. सादलगाव येथे दोन बहिणी या शेतात उस तोडणी करत होत्या. यावेळी उसाचा ट्रॅक्टर रस्त्यावर आणण्याच्या प्रयत्नात असताना एक वीज कोसळल्याने एका १६ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तिची बहीण गंभीर जखमी झाली आहे. ही घटना बुधवारी दुपारी घडली.

ट्रेंडिंग न्यूज

रिता सिताराम नाईक ( वय १६, मूळ राहणार आडशी, या. जि. नंदूरबार) असे वीज पडून मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर या तरुणीची विवाहित बहीण गीता राजेश वळवी ही गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी गीता वर मांडवगण फराटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दोघी बहिणी या सादलगाव येथे उसाच्या शेतात काम करत होत्या. उसतोडणी सुरू होती. दरम्यान तोडलेला उस ट्रॅक्टरमध्ये भरुन तो रस्त्यावर आणला जाणार होता. मात्र, पावसामुळे त्यात अडथळा येत होता. ट्रॅक्टर रस्त्यावर कसा येईल याची पाहणी करत असतांना दोघी बहिणी या रस्त्यावर आल्या. याच वेळी एक वीज या बहीणींच्या अंगावर पाडली. यात रिता हिचा जागीच मृत्यू झाला तर गीता ही गंभीर जखमी झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी मांडवगण फराटा प्राथमिक आरोग्य केंद्रात स्थानिक नागरिकआणि नेले. मात्र, डॉक्टरांनी रीताला मृत घोषित केले. तर बेशुद्धावस्थेतील गीता हीला उपचारासाठी खासगी दवाखान्यात पाठवले. गीता हीची प्रकृती गंभीर आहे. मृत रीता हीचा मृतदेह पोस्टमॉरटम साठी न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

विभाग