मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sambhaji Nagar News : लिफ्टमध्ये अडकल्याने १४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, संभाजीनगरमधील दुर्दैवी घटना

Sambhaji Nagar News : लिफ्टमध्ये अडकल्याने १४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, संभाजीनगरमधील दुर्दैवी घटना

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 15, 2023 10:05 AM IST

Chhatrapati Sambhaji Nagar News : लिफ्टमध्ये अडकल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar News
Chhatrapati Sambhaji Nagar News (HT)

Chhatrapati Sambhaji Nagar News : संभाजीनगर शहरातील कटकट गेट परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लिफ्टमध्ये अडकून १४ वर्षीय चिमुकल्याचं दुर्देवी मृत्यू झाला आहे. आई-वडील हैदराबादला गेलेले असताना मुलाचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाल्यामुळं शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. साकिब इरफान सिद्दीकी असं लिफ्टमध्ये अडकून मृत्यूमुखी पडलेल्या चिमुकल्याचं नाव आहे. तिसऱ्या मजल्यावर खेळत असताना त्याने लिफ्टच्या बाहेर डोकं काढलं. त्यानंतर लिफ्ट सुरू झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. त्यानंतर जिन्सी पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत चिमुकल्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर शहरातील कटकट गेट परिसरात राहणारे इरफान सिद्दिकी हे काही कामानिमित्त पत्नीसह हैदराबादेत गेले होते. त्यावेळी साकिब हा आजोबांसोबत घरात खेळत होता. दरवाजा उघडून साकिब लिफ्टमध्ये शिरला. तिथून त्याने घरात डोकावलं असता अचानक लिफ्ट सुरू झाली. त्यानंतर साकिबचं शीर धडावेगळं झाल्यानं त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत चिमुकल्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. त्यानंतर शेजाऱ्यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये घराच्या दरवाज्यासमोरच लिफ्ट आहे. त्यामुळं अनेकदा दुर्दैवी अपघात घडल्याच्या घटना समोर आलेल्या आहे. त्यातच आता शहरातील कटकट गेट परिसरात लिफ्टमध्ये अडकून १४ वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यू झाल्यामुळं शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याशिवाय लिफ्टपासून चिमुकल्यांना दूर ठेवण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

IPL_Entry_Point