मराठी बातम्या  /  Lifestyle  /  You Should Avoid These Skin Care Mistakes To Get Glowing Skin For Eid

Eid 2023: ईदला हवी ग्लोइंग स्किन तर आजपासून टाळा या चुका

ईदसाठी स्किन केअर टिप्स
ईदसाठी स्किन केअर टिप्स
Hiral Shriram Gawande • HT Marathi
Apr 19, 2023 11:08 AM IST

Skin Care Mistakes: रमजानचा महिना सुरू असून काही दिवसात ईद येत आहे. या खास दिवशी सुंदर दिसण्यासाठी महिला अनेक गोष्टी करतात. ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी या काही गोष्टी टाळल्या पाहिजे.

Eid Skin Care Tips: सध्या रमजानचा महिना सुरू असून लवकरच ईद येणार आहे. ईदसाठी महिला कितीतरी दिवसांपासून तयारीला लागतात. सर्वात सुंदर दिसण्यासाठी कपड्यांच्या खरेदीपासून स्किन केअर पर्यंत अनेक गोष्टींची त्या काळजी घेतात. ईदच्या दिवशी तुम्हाला फ्लॉलेस स्किन मिळवायची असेल, तर आजपासूनच काही सवयी बदलाव्या लागतील. जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

तेलकट अन्न टाळा

रमजान दरम्यान लोक सेहरी आणि इफ्तार दोन्हीमध्ये विविध प्रकारचे पदार्थ तयार करतात. यामध्ये तेलकट पदार्थांचा सुद्धा समावेश होतो. तेलकट अन्न त्वचेचे नुकसान करते. जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्याने तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचते. असे अन्न तुम्ही आठवड्यातून एकदा खाऊ शकता. हे लक्षात ठेवा की जर तुम्ही असे अन्न खाल्ले तर लगेच कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

Eid 2023: ईदला ट्राय करा हानिया आमिरचा व्हायरल मेकअप लूक! असा करा रीक्रिएट

पाण्याच्या प्रमाणाकडे लक्ष द्या

आपल्या शरीराला पाण्याची सर्वाधिक गरज असते. या काळात लोक खूप कमी पाणी पितात, यामुळे देखील त्वचा निस्तेज होते. रमजानचे उपवास सोडल्यानंतर शक्य तितके पाणी प्या. असे केल्याने चेहऱ्यावरील ओलावा टिकून राहतो. अशावेळी अधिकाधिक पाणी प्यावे.

तणावापासून दूर राहा

तज्ज्ञांच्या मते, तुम्ही मानसिकदृष्ट्या संतुलित राहिल्यास, तुमची त्वचा स्वतःच चमकदार आणि सुंदर दिसते. चांगल्या आणि फ्लॉलेस त्वचेसाठी स्ट्रेस घेऊ नका.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel