Yoga Mantra: सुंदर त्वचा देतील 'ही' योगासनं, नियमित करा सराव-yoga mantra these yoga poses will give you beautiful skin practice regularly ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: सुंदर त्वचा देतील 'ही' योगासनं, नियमित करा सराव

Yoga Mantra: सुंदर त्वचा देतील 'ही' योगासनं, नियमित करा सराव

May 27, 2023 08:24 AM IST

Yoga Poses: सुंदर, चमकदार त्वचा कोणाला नको असते? प्रत्येक मुलीचे ग्लोइंग स्किनचे स्वप्न असते. हे पूर्ण करण्यासाठी आपल्या रुटीनमध्ये हे योगासनांचा समावेश करा.

हलासन
हलासन

Yoga Poses For Beautiful Skin: स्त्री असो वा पुरुष, सुंदर चमकणारी त्वचा हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक बाजारात उपलब्ध अनेक ब्युटी प्रोडक्ट्स आणि ट्रीटमेंट्स वापरतात. त्यामुळे अनेक वेळा चेहऱ्यावर दुष्परिणामही दिसून येतात. तुमच्यासोबतही असेच काही घडले असेल तर चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी ब्युटी प्रोडक्ट्स सोडा आणि या योगासनांची मदत घ्या. या योगासनांमुळे तुमचे शरीर आतून आणि बाहेरून तंदुरुस्त आणि आकर्षक तर होईलच, पण तुमच्या चेहऱ्यावर गुलाबी चमकही येईल.

भुजंगासन

भुजंगासन छाती उघडून शरीरातील थकवा कमी करण्यास मदत करते. हे आसन केल्याने शरीराला अतिरिक्त ऑक्सिजन मिळण्यासोबतच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. त्यामुळे त्वचा चमकते.

उष्ट्रासन

याला कॅमल पोझ असे देखील म्हणतात. हे करताना व्यक्तीला पूर्णपणे मागे वाकावे लागते. हे आसन तुमची बरगडी उघडून तुमची फुफ्फुसाची क्षमता वाढवण्यास मदत करते. केस गळतीच्या समस्येपासून आराम मिळण्यासोबतच या योगाच्या सरावाने तणावाची पातळीही कमी होते. त्यामुळे व्यक्तीची त्वचा चमकते.

मत्स्यासन

हे आसन तुमच्या घशाच्या आणि चेहऱ्याच्या स्नायूंना टोन करते आणि तुमच्या त्वचेला एक अद्भुत चमक आणते. याशिवाय हार्मोन्स सामान्य करण्यासाठी मत्स्यासन खूप फायदेशीर आहे.

हलासन

हे आसन केल्याने संपूर्ण शरीरातील ब्लड सर्कुलेशन सुधारते. तणाव कमी करून, हे आसन झोपेशी संबंधित समस्या सोडवण्यास देखील मदत करते. त्यामुळे व्यक्तीच्या त्वचेची गुणवत्ता सुधारते आणि ती दिसायला चमकदार बनते.

त्रिकोनासन

हे आसन तुमचे मन आणि शरीराचे संतुलन राखण्यास मदत करते आणि हात आणि पाय कडक आणि मजबूत ठेवण्यास देखील मदत करते. हे आसन केल्याने ताजेपणा अनुभवता येतो आणि चमकदार त्वचेचे स्वप्नही पूर्ण होते.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग