Yoga Mantra: योगचा पूर्ण फायदा हवा असेल तर चुकूनही करु नका या चुका-yoga mantra avoid these things during yoga for better benefits ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: योगचा पूर्ण फायदा हवा असेल तर चुकूनही करु नका या चुका

Yoga Mantra: योगचा पूर्ण फायदा हवा असेल तर चुकूनही करु नका या चुका

Mar 14, 2023 08:18 AM IST

Yoga Mistakes: अनेक वेळा नियमित योगासन करुन देखील पाहिजे तसा परिणाम मिळत नाही. याचे कारण म्हणजे कळत नकळत होणाऱ्या चुका. योग करताना या गोष्टी करणे टाळा.

योगासन
योगासन

Avoid These Things During Yoga: फिट राहण्यासाठी तुम्ही कोणतेही रुटीन फॉलो करु शकता. पण काही मूलभूत गोष्टी माहित करुन घेणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे, तरच तुम्हाला पूर्ण लाभ मिळू शकतो. शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगासने करणे खूप आवश्यक आहे. अनेकदा लोक अशा काही चुका करतात की त्यांना योगाचा पूर्ण लाभ मिळत नाही. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या चुका

ऑनलाइन क्लासेस करत असताना अचानक स्क्रीनकडे पाहणे

जर तुम्ही घरबसल्या ऑनलाइन क्लासेस करत असाल तर तुम्हाला अधिक काळजी घेण्याची गरज आहे. जेव्हा लॅपटॉप तुमच्या समोर जमिनीवर असेल आणि तुम्ही सूचनांचे पालन करण्यास सुरुवात केली असेल, तेव्हा आसनच्या मध्ये अचानक थांबू नका आणि स्क्रीनकडे पाहण्यासाठी तुमचे डोके किंवा मान वर करू नका. यामुळे ताण किंवा मोच याचा धोका होऊ शकतो.

टाइट कपड्यांमध्ये योग करणे

योगा करताना थोडे ढगळ कपडे असावेत, जेणेकरून घाम येण्याची जागा मिळेल. योगा केल्याने शरीरातून घामही बाहेर पडतो. ही ऊर्जा बाहेर पडणे खूप आवश्यक आहे. पण घट्ट कपड्यांमध्ये असे होऊ शकत नाही. त्यामुळे फॉर्म फिटिंग असले तरी खूप टाइट कपडे घालू नका.

घाई घाईत योगासन करणे

योग म्हणजे श्वासोच्छवास आणि इतर व्यायामांवर लक्ष देणे आणि लक्ष केंद्रित करणे. अशा स्थितीत केवळ आसनांची पटकन पुनरावृत्ती करण्याच्या नादात योग करू नका. असे केल्याने योगासनाचा खरा उद्देश पूर्ण होणार नाही. तुम्हाला प्रत्येक आसन हळूहळू रिपीट करावे लागेल.

एकाच आसनाची पुनरावृत्ती

तुम्ही व्यायामाची पुनरावृत्ती बर्‍याच प्रमाणात करू शकता. परंतु योगाच्या बाबतीत तसे करू नका. तुम्हाला सहज शक्य नसलेले आसन पूर्ण करण्यासाठी घाई करू नका. अशी अनेक सोपी आसने आहेत जी करायला खूप वेळ लागतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग