मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Blood Sugar Level: काही लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी सतत कमी जास्त का होते?

Blood Sugar Level: काही लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी सतत कमी जास्त का होते?

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 08, 2023 01:56 PM IST

Health Care Tips: आहाराची पूर्ण काळजी घेतल्यानंतरही काही लोकांचे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात नसते आणि अनेक वेळा त्यात चढ-उतार होतात. त्यामुळे मधुमेहाची समस्या अधिक सतावते.

रक्तातील साखरेचे प्रमाण
रक्तातील साखरेचे प्रमाण

Why Blood Sugar Level Fluctuate: रक्तातील साखरेच्या पातळीचा थेट परिणाम मधुमेहावर होतो. जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असते तेव्हा मधुमेह होतो. पण रक्तातील साखरेचे प्रमाण किती वाढल्याने मधुमेह होण्याची भीती असते हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जेव्हा रक्तातील साखरेची पातळी १२५ मिलीग्राम असते, तेव्हा मधुमेहाचा धोका असतो. त्याच वेळी १०० ते १२५ मिलीग्राम पातळी प्री-डायबिटीज मानली जाते. जेवणापूर्वी ब्लड शुगर टेस्ट केल्याने योग्य लेव्हल कळते. जर तुम्ही काही खाल्ल्यानंतर ब्लड शुगर टेस्ट केली तर ग्लुकोजच्या पातळीवर परिणाम होतो आणि रक्तातील साखरेचे योग्य प्रमाण कळत नाही.

मधुमेहाच्या बाबतीत रक्तातील साखरेची पातळी योग्य आहाराद्वारे नियंत्रित केली जाते. पण काही लोकांमध्ये लाख प्रयत्नांनंतरही रक्तातील साखरेची पातळी वर-खाली होत जाते. चला तर मग जाणून घेऊया यामागची कारणे काय आहेत.

Anger Control: छोट्या छोट्या गोष्टींवर राग येतो? आयुर्वेदात सांगितलेल्या या ड्रिंक्सने करा नियंत्रित

डिहायड्रेशन

कधी कधी शरीरात पाण्याची कमतरता ग्लुकोजच्या पातळीवर परिणाम करते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वर-खाली होत जाते. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांना उन्हाळ्यात भरपूर पाणी पिण्याचा आणि हायड्रेटेड राहण्याचा सल्ला दिला जातो.

योग्य औषधांचा अभाव

मधुमेहाच्या रुग्णांना योग्य आहारासोबतच योग्य औषधे मिळणे आवश्यक आहे. जर तुमच्या रक्तातील साखरेमध्ये वारंवार चढ-उतार होत असेल तर कदाचित तुमची औषधे योग्य नसतील आणि शरीरावर नीट काम करत नसतील. मधुमेही रुग्ण दररोज रक्तातील साखरेची पातळी तपासत नाहीत आणि त्याच औषधांना चिकटून राहतात. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी जास्त होत राहते.

Peanuts Side Effects: या आजारांना आमंत्रण देते शेंगदाणे, खाण्यापूर्वी जाणून घ्या

स्टिरॉइड्समुळे

तुम्ही इतर काही औषधे घेत असताना स्टिरॉइड्समुळे रक्तातील साखर वाढू शकते .

तणावामुळे वाढते ब्लड शुगर लेव्हल

ताण-तणाव हे अनेक आजारांचे कारण आहे. अति तणावामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते. मेयो क्लिनिकच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की शारीरिक किंवा मानसिक तणाव रक्तातील साखरेची पातळी वाढवण्यास मदत करणारे हार्मोन्स सोडतात.

झोप आहे महत्त्वाची

झोप ही शरीरासाठी अन्ना इतकीच महत्त्वाची आहे. झोपेच्या कमतरतेमुळे शरीरातील अवयव आणि हार्मोन्स बिघडतात आणि नीट काम करणे थांबवतात. एक रात्र झोप पूर्ण झाली नाही तर शरीरात इन्सुलिनचा वापर कमी होतो. म्हणूनच दररोज पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel