मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Anger Control: छोट्या छोट्या गोष्टींवर राग येतो? आयुर्वेदात सांगितलेल्या या ड्रिंक्सने करा नियंत्रित

Anger Control: छोट्या छोट्या गोष्टींवर राग येतो? आयुर्वेदात सांगितलेल्या या ड्रिंक्सने करा नियंत्रित

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 07, 2023 10:10 PM IST

Ayurveda Tips: जर तुम्हाला प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीवर राग येत असेल तर आयुर्वेदानुसार शरीरातील अग्नी शक्ती वाढली आहे. शांत होण्यासाठी हे पदार्थ खाऊ नयेत आणि ही ड्रिंक्स प्यावीत.

रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी आयुर्वेदिक ड्रिंक्स
रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी आयुर्वेदिक ड्रिंक्स (unsplash)

Ayurvedic Drinks to Control Anger: हसणे आणि दुःखी होणे याप्रमाणेच राग ही देखील एक प्रकारची भावना आहे. जो व्यक्त होण्याचा योग्य मार्ग असावा. पण काही लोकांना विनाकारण राग येतो. आणि मग ते रागाच्या भरात काय बोलतात आणि करतात, याची त्यांना स्वतःला कल्पना नसते. काही वेळा राग शांत झाल्यावर त्यांना खूप पेचही सहन करावा लागतो. आयुर्वेदानुसार राग येण्याचे कारण म्हणजे शरीरात पित्त दोष वाढणे. त्यामुळे शरीरात अग्नी ऊर्जा वाढू लागते आणि मग राग येतो. आयुर्वेदानुसार या गोष्टींचा आहारात समावेश केल्यास रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

World Laughter Day: इम्युनिटी बूस्ट असो वा स्ट्रेस कमी करणे, १० मिनिटं हसण्यामुळे मिळतात आश्चर्यकारक फायदे

राग आल्यावर या गोष्टी खाऊ नका

छोट्या-छोट्या गोष्टींवर राग आला तर आहारात या गोष्टी न खाण्याचा प्रयत्न करा. विशेषतः जेव्हा तुम्ही रागावता. आयुर्वेदानुसार राग आल्यावर शरीरात उष्णता निर्माण होऊ लागते. अशा परिस्थितीत अशा पदार्थांमुळे उष्णता वाढते आणि राग कमी होण्याऐवजी तो भडकतो.

- मसालेदार आणि गरम अन्न

- राग आल्यावर आंबट लिंबू वर्गीय फळे खाऊ नका

- राग आल्यावर दारू पिणे टाळा.

- एवढेच नाही तर रागाच्या वेळी कॅफिन, चहा, कॉफी पिऊ नका.

Peanuts Side Effects: या आजारांना आमंत्रण देते शेंगदाणे, खाण्यापूर्वी जाणून घ्या

रागावर नियंत्रण ठेवायचे असेल तर हे ड्रिंक्स प्या

हर्बल टी

आयुर्वेदानुसार तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर राग येत असेल तर हर्बल टी प्यायल्याने शरीरातील उष्णता शांत होते. हर्बल चहा बनवण्यासाठी फक्त तीन गोष्टींची गरज असते- कॅमोमाइल, तुळशीची पाने आणि गुलाबाची पावडर. या तीन गोष्टी गरम पाण्यात मिसळून ठेवा. पूर्ण थंड झाल्यावर हा चहा दिवसातून तीन वेळा प्या. त्यामुळे शरीरात निर्माण होणारे पित्त कमी होण्यास मदत होईल आणि रागावर नियंत्रण राहील.

द्राक्षाचा रस

द्राक्षाचा रस आयुर्वेदात राग नियंत्रणासाठी सर्वोत्तम असल्याचे वर्णन केले आहे. एक कप द्राक्षाच्या रसात एक चमचा बडीशेप आणि जिरे मिक्स करा. त्यासोबत एक चमचा चंदन पावडर मिक्स करा. हे पेय प्या. हे राग पूर्णपणे शांत करण्याचे काम करेल. यासोबतच पोटातील जळजळही कमी होईल.

Belly Fat कमी करण्यासाठी तुम्ही तर या चुका करत नाही ना? जाणून घ्या चरबी वाढण्याचे कारण

हे काम करा

- जर राग जास्त येत असेल तर दररोज ध्यान आणि प्राणायाम करणे फायदेशीर ठरेल.

- यासोबतच मॅग्नेशियम समृद्ध पदार्थ खा. ओमेगा ३ फॅटी अॅसिड असलेले पदार्थ खाणे जसे की मशरूम, अक्रोड हे देखील रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.

- आहारात नेहमी रंगीबेरंगी भाज्या आणि फळे ठेवा. या सर्व गोष्टी रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग