मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Peanuts Side Effects: या आजारांना आमंत्रण देते शेंगदाणे, खाण्यापूर्वी जाणून घ्या

Peanuts Side Effects: या आजारांना आमंत्रण देते शेंगदाणे, खाण्यापूर्वी जाणून घ्या

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 07, 2023 02:00 PM IST

Health Problems: शेंगदाण्याला गरिबांचे बदाम म्हटले जाते. आरोग्यासाठी फायद्याचे असले तरी काही समस्या असणाऱ्या लोकांनी ते जास्त खाणे टाळले पाहिजे. अन्यथा अनेक आजार होण्याचा धोका असतो.

शेंगदाणे खाण्याचे साईड इफेक्ट्स
शेंगदाणे खाण्याचे साईड इफेक्ट्स (Freepik)

Side Effects of Eating Too Much Peanuts: भुईमुग म्हणजेच शेंगदाण्याला गरिबांचा बदाम म्हणतात. लोक हे उपवासात खातात. शिवाय रोजही पोहे, उपमा किंवा इतर पदार्थात टाकून देखील हे आवडीने खाल्ले जाते. जर शेंगदाणे तुमच्या दैनंदिन जीवनाचा एक आवश्यक भाग असेल तर काळजी घ्या. अतिरिक्त शेंगदाणे अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकतात. अनेकदा लोकांना बाजारातून भाजलेले शेंगदाणे, चिक्की, पीनट बटर खायला आवडते. त्याचबरोबर उपवासाच्या वेळी शेंगदाणे तुपात किंवा तेलात तळून खातात. त्यामुळे शेंगदाणे आरोग्यासाठी फायदेशीर होण्याऐवजी हानिकारक बनते आणि अनेक आजारांना जन्म देऊ लागते.

World Laughter Day: इम्युनिटी बूस्ट असो वा स्ट्रेस कमी करणे, १० मिनिटं हसण्यामुळे मिळतात आश्चर्यकारक फायदे

ते नुकसान का करते?

सर्वात मोठे कारण म्हणजे शेंगदाण्याचे प्रमाण हे आहे. एका दिवसात प्रत्येक गोष्ट किती प्रमाणात खायची हे ठरवले जाते. जेव्हा आपण ठरवलेल्या प्रमाणापेक्षा जास्त काहीही खातो तेव्हा त्याचा शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ लागते. शेंगदाण्याबाबतही अनेकदा असेच घडते. गरीबांचे बदाम म्हटल्या जाणार्‍या शेंगदाण्यात बदामासारखे आवश्यक पोषण असते. पण बदामाच्या प्रमाणात ते खाण्याऐवजी लोक दोन मूठ किंवा तीन मुठभर खातात. त्यामुळे नुकसान होऊ लागते. काही लोकांना साधारणपणे शेंगदाण्यापासून एलर्जी असते. अशा लोकांनी कोणत्याही परिस्थितीत शेंगदाणे खाऊ नये. अन्यथा श्वास लागणे, खाज सुटणे, जळजळ होणे, धाप लागणे, घसा खवखवणे अशा समस्या उद्भवू लागतात.

Belly Fat कमी करण्यासाठी तुम्ही तर या चुका करत नाही ना? जाणून घ्या चरबी वाढण्याचे कारण

वजन वाढण्याची समस्या

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी शेंगदाणे खात असाल तर ठराविक प्रमाणातच खाणे आवश्यक आहे. त्यात आढळणारे अनसॅच्युरेटेड फॅट शरीरात जमा होऊन चरबी बनवते. त्याच वेळी, ते हृदयाच्या समस्यांना देखील प्रोत्साहन देऊ शकते. सुमारे १ औंस भाजलेले शेंगदाणे म्हणजेच मूठभर शेंगदाणे रोज खावेत. मूठभर शेंगदाण्यामध्ये १७० कॅलरीज असतात. जे जास्त प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढण्याची खात्री असते.

Heart Health: हृदयविकारांपासून दूर राहायचं? आहारात नक्कीच घ्या 'हे' पदार्थ

शेंगदाण्यामुळे पचन बिघडते

शेंगदाणे खाल्ल्याने अनेकांना एलर्जी होते. त्यामुळे पोटदुखी, जुलाब, उलट्या, मळमळ, घशाचा त्रास, श्वास घेण्यास त्रास होणे, अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी यासारख्या समस्या उद्भवू लागतात.

होतो हा आजार

शेंगदाणे जास्त खाल्ल्याने काहींना दवाखान्यात जावे लागते. शेंगदाणे खाल्ल्याने अॅनाफिलेक्सिस होऊ शकतो. ज्यामध्ये रक्तदाब कमी होऊ लागतो. श्वासाच्या नळ्या आकुंचित होऊ लागतात. त्यामुळे श्वास घेता येत नाही. चक्कर येणे आणि बेशुद्ध होऊ शकते.

Mint Tea: लठ्ठपणा असो वा मायग्रेन आराम देईल पुदिनाच्या चहा, रोज प्यायल्याने होतात हे फायदे

उच्च रक्तदाबाची समस्या

जर तुम्ही भाजलेले आणि खारवलेले शेंगदाणे खाल्ले तर त्यामध्ये मिठाचे प्रमाण खूप जास्त असते. ज्यामुळे शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. घरी भाजलेले शेंगदाणे खाणे चांगले असते.

अत्यावश्यक खनिजांची कमतरता होते

शेंगदाण्यामध्ये फॉस्फरसचे प्रमाण खूप जास्त असते, जे शरीरात फायटिक अॅसिडच्या रूपात साठवले जाते. शेंगदाणे जास्त प्रमाणात खाल्ल्यास शरीरातील फायटिक अॅसिडचे प्रमाण वाढते. त्यानंतर ते लोह, जस्त, कॅल्शियम आणि मॅंगनीज या खनिजांचे शोषण थांबवते. त्यामुळे शरीरात इतर पौष्टिक घटकांची कमतरता निर्माण होते.

 

एका दिवसात किती शेंगदाणे खावे

शेंगदाण्यामध्ये भरपूर पौष्टिक घटक असतात. ज्यामध्ये प्रोटीन, फॅट, फायबर, मिनरल्स यांचा समावेश होतो. दररोज फक्त मूठभर शेंगदाणे खाणे फायदेशीर आहे. ते जास्त खाऊ नका, विशेषतः उन्हाळ्यात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग