मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  How To Treat Heatstroke: उष्माघात टाळण्यासाठी काय करावे? जाणून घ्या लक्षणे आणि कारणे

How To Treat Heatstroke: उष्माघात टाळण्यासाठी काय करावे? जाणून घ्या लक्षणे आणि कारणे

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Apr 17, 2023 07:57 AM IST

How To Avoid Heat Stroke: कडक उन्हाळा सुरु झाला आहे. अशावेळी जास्त उन्हात तुम्ही घराबाहेर पडल्यास अनेकदा उष्माघात होतो. नुकतेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी आलेल्या ११ श्री सदस्यांना उष्माघातामुळे मृत्यू झाला, तर काहींची प्रकृती ही चिंताजनक आहे.

Health Care
Health Care (Freepik)

Heat Stroke In Summer: उष्माघात ही एक स्थिती आहे जी आपल्या शरीराच्या अतिउष्णतेमुळे उद्भवते. उष्माघाताचा (Summer Health Care) हा सर्वात गंभीर प्रकार उद्भवू शकतो जेव्हा तुमच्या शरीराचे तापमान ४० सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त वाढते. ही स्थिती उन्हाळ्याच्या महिन्यांत सर्वात सामान्य आहे. उष्माघातासाठी आपत्कालीन उपचार आवश्यक आहेत. दुर्लक्ष केल्यास, उष्माघाताने तुमचा मेंदू, हृदय, मूत्रपिंड आणि स्नायूंना त्वरीत नुकसान होऊ शकते. चला जाणून घेऊयात उष्माघाताची लक्षणे, कारणे आणि काळजी घेण्यासाठी टिप्स...

उष्माघात टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

> नेहमी पुरेसे पिण्याचे पाणी सोबत ठेवा.

> भरपूर पाणी प्या आणि तहान लागली नसली तरी प्या.

> चांगली टोपी घाला.

> सनग्लासेस घाला.

> सूर्यापासून दूर राहण्यासाठी दिवसभरातील ऍक्टिव्हिटी भर उन्हात करू नकात.

> हलके आणि सैल कपडे घाला

> कार्बोहायड्रेटचे सेवन वाढवा आणि प्रथिनांचे सेवन कमी करा.

> अल्कोहोलयुक्त आणि कार्बोनेटेड पेये टाळा

> पुरेशा प्रमाणात मिठाचे सेवन करणे किंवा ओआरएस/इलेक्ट्रल सारखी व्यावसायिकरित्या उपलब्ध इलेक्ट्रोलाइट पेये घ्या.

> थेट सूर्यप्रकाश टाळा.

उष्माघाताची लक्षणे काय आहेत?

> मांडी आणि खांद्यावर उष्णतेमुळे पेटके

> चक्कर येणे

> बेशुद्ध होणे

> मळमळ

> उलट्या होणे

> डोकेदुखी

> जास्त घाम येणे

> उच्च शरीराचे तापमान

> बदललेली मानसिक स्थिती

> अत्यंत कोरडी त्वचा

प्री हॉस्पिटल केअर

> जर तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसली तर स्वतःला सूर्यापासून दूर ठेवा. सावलीच्या जागी बसा किंवा झोपा.

> थंड पाण्याने ओल्या टॉवेलमध्ये शरीर/हात/पाय स्पंज करून किंवा गुंडाळून शरीराचे तापमान सक्रियपणे कमी करा.

> एका ग्लास पाण्यात एक चमचे मीठ किंवा इलेक्ट्रोलाइटची पावडर मिसळून हे मिश्रण हळूहळू प्या.

> स्वतःला पूर्णपणे बरे होण्यासाठी पुरेसा वेळ द्या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग