Hair Mask: केसांना हेअर मास्क लावण्याची काय आहे पद्धत? जाणून घ्या योग्य स्टेप्स-what are the right steps to apply hair mask on hair ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hair Mask: केसांना हेअर मास्क लावण्याची काय आहे पद्धत? जाणून घ्या योग्य स्टेप्स

Hair Mask: केसांना हेअर मास्क लावण्याची काय आहे पद्धत? जाणून घ्या योग्य स्टेप्स

May 02, 2023 06:21 PM IST

How to Apply Hair Mask: केसांना स्मूद, सिल्की आणि शाइनी बनवण्यासाठी तुम्ही हेअर मास्क वापरू शकता. पण ते योग्य पद्धतीने लावणे महत्त्वाचे आहे. ते लावण्याचे योग्य स्टेप्स जाणून घ्या.

हेअर मास्क लावण्याची योग्य पद्धत
हेअर मास्क लावण्याची योग्य पद्धत

Right Way to Apply Hair Mask: स्मूथ, सिल्की आणि शाइनी केस तुमचे लूक बर्‍याच प्रमाणात सुंदर बनवतात. मात्र केसांची योग्य काळजी न घेतल्यास ते कोरडे आणि निर्जीव होतात. अशा परिस्थितीत केसांची योग्य काळजी घेणे देखील आवश्यक आहे. हेअर मास्क केसांसाठी फायदेशीर आहे. कारण ते आर्द्रता वाढवते. पण ते योग्य पद्धतीने लावणे आवश्यक आहे. हेअर मास्क लावण्याच्या स्टेप्स येथे पहा -

Straight Hair: कोणत्याही डॅमेजशिवाय घरीच मिळतील स्ट्रेस केस, फक्त फॉलो करा या होम रेमेडीज

हेअर मास्क लावण्याच्या स्टेप्स

स्टेप १ - स्वच्छ केसांपासून सुरुवात करा

हेअर मास्क लावण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते लावण्यापूर्वी केस पूर्णपणे स्वच्छ असले पाहिजेत. याचे कारण असे की स्वच्छ टाळू हेअर मास्कचे चांगलेपणा शोषून घेते. जर तुमचे केस कोरडे आणि गुंता झालेले असतील तर मास्क लावण्यापूर्वी तुमचे केस आधी शॅम्पू करा आणि नंतर कंडिशनर लावा. जर तुमचे स्काल्प ऑइली असेल तर केस धुणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. हेअर मास्क लावल्याने केसांची सर्व आर्द्रता परत मिळू शकते.

स्टेप २ - एक्स्ट्रा पाणी पुसून टाका

बेस्ट रिझल्टसाठी ओल्या केसांवर हेअर मास्क लावा. लक्षात ठेवा की केस कोरडे किंवा ओले नसावे. अशा प्रकारे तुमच्या हेअर मास्कमधील सर्व उत्कृष्ट घटक प्रत्येक स्ट्रँडमध्ये खोलवर जातात. यासाठी केस धुल्यानंतर केसांमधील अतिरिक्त पाणी काढून टाका. यासाठी तुम्ही मायक्रोफायबर टॉवेल किंवा कॉटन टी-शर्ट वापरू शकता.

Hair Care Tips: केसांसाठी वरदानापेक्षा कमी नाही ओव्याचे तेल, रोज लावल्याने मिळतील अनेक फायदे

स्टेप ३ - आता हेअर मास्क लावा

लक्षात ठेवा की जास्त मास्क लावायचे नाही. फक्त थोडे पुरेसे आहे. तुमच्या केसांच्या टोकांवर लक्ष केंद्रित करून मास्क लावणे सुरू करा. प्रोडक्टला तुमच्या केसांमध्ये कमीत कमी ३० सेकंद मसाज करा आणि केसांच्या टोकापर्यंत खाली या. हे प्रोडक्टच्या उत्तम प्रकारे लावण्यात मदत करेल.

स्टेप ४ - वेळ नोट करा

तसं तर हेअर मास्क लावून ठेवण्यासाठी फक्त ३ ते ५ मिनिटांचा वेळ आहे, परंतु तरीही तुम्ही वापरत असलेल्या कंपनीच्या हेअर मास्कचा बॉक्स पहा, तो किती वेळ ठेवावा लागेल. बेस्ट रिझल्टसाठी तुम्ही हॉट टॉवेल पद्धत वापरून पाहू शकता. ज्यामध्ये तुम्ही गरम पाण्यात भिजवलेल्या टॉवेलने तुमचे केस झाकता.

स्टेप ५ - नीट धुवा

हेअर मास्क केसांना आर्द्रता देतात. जेव्हा तुमच्या स्कॅल्पने तुमच्या हेअर मास्कमधील सर्व चांगले गुण शोषला असेल, तेव्हा तो स्वच्छ धुवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग