मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hair Care Tips: केसांसाठी वरदानापेक्षा कमी नाही ओव्याचे तेल, रोज लावल्याने मिळतील अनेक फायदे

Hair Care Tips: केसांसाठी वरदानापेक्षा कमी नाही ओव्याचे तेल, रोज लावल्याने मिळतील अनेक फायदे

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 29, 2023 01:36 PM IST

Hair Care With Carom Seeds: केस गळण्याच्या समस्येने प्रत्येक व्यक्ती त्रस्त आहे. शिवाय अकाली पांढरे होणारे केस सुद्धा अनेकांची चिंता वाढवतात. तुम्हाला सुद्धा केसांच्या समस्यांपासून सुटका मिळवायची असेल तर तुम्ही ओव्याचे तेल वापरू शकता.

केसांसाठी ओव्याच्या तेलाचे फायदे
केसांसाठी ओव्याच्या तेलाचे फायदे (freepik)

Benefits of Ajwain or Carom Seeds Oil for Hair: जेवणाची चव वाढवण्यासाठी असो वा सुगंध अनेक गोष्टीत ओवा वापरला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की ओव्याचा उपयोग फक्त पोटाच्या आरोग्यासाठी आणि जेवणाच्या सुगंधासाठी केला जात नाही. ओव्याच्या मदतीने तुम्ही तुमचे पांढरे झालेले केस पुन्हा एकदा पूर्वीसारखे काळे आणि चमकदार बनवू शकता. आज प्रत्येक जण केसांच्या विविध समस्येने त्रस्त आहे. केस गळती असो वा अकाली पांढरे होणार केस. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही केसांच्या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल तुम्ही केसांना ओव्याचे तेल लावू शकता. ओव्याचे तेल केसांना लावल्याने कोणते फायदे होतात आणि हे तेल कसे बनतात ते जाणून घेऊया.

Hair Growth: हेअर ग्रोथसाठी केसांवर एलोवेरामध्ये मिसळून लावा या गोष्टी, मिळेल बेस्ट रिझल्ट

केसांसाठी ओव्याच्या तेलाचे फायदे

केस काळे होतात

जर तुमचे केस लहान वयातच पांढरे होऊ लागले असतील तर ओव्याचे तेल त्यांना पुन्हा काळे होण्यास मदत करू शकते. हा उपाय करण्यासाठी ओव्याच्या तेलात कढीपत्ता आणि खोबरेल तेल मिसळून हे तेल तयार करा. केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी या तेलाने केसांना मसाज करा आणि सकाळी शॅम्पू करा.

केसांची वाढ चांगली होते

ओव्याचे तेल केसांना लावल्याने केसांची वाढ चांगली होते. ओव्यामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुण असल्यामुळे ते केसांच्या वाढीस देखील मदत करते.

Grey Hair: पांढरे केस काळे करायचे? मोहरीच्या तेलात मिक्स करून लावा या २ गोष्टी

शाइनी हेअर

जर तुमचे केस कोरडे राहत असतील तर केसांना ओव्याचे तेल लावल्याने केस चमकदार होऊ शकतात. ओव्याचे तेल केसांना मॉइश्चरायझ करते आणि त्यांची चमक वाढवते.

डँड्रफ पासून सुटका

ओव्याच्या तेलामध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल गुणधर्म केसांमधली कोंड्याची समस्या दूर करण्यास मदत करतात.

कसे बनवावे ओव्याचे तेल

ओव्याचे तेल बनवण्यासाठी सर्वप्रथम १ वाटी खोबरेल तेल हलके गरम करा. त्यात १ चमचे ओवा आणि १० कढीपत्ताचे पानं घालून चांगले शिजवा. आता हे तेल थंड होण्यासाठी ठेवा. तेल थंड झाल्यावर चाळणीने गाळून बाटलीत भरून ठेवा. हे तेल केस धुण्याच्या २ ते ३ तास आधी केसांना लावा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग