मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hair Growth: हेअर ग्रोथसाठी केसांवर एलोवेरामध्ये मिसळून लावा या गोष्टी, मिळेल बेस्ट रिझल्ट

Hair Growth: हेअर ग्रोथसाठी केसांवर एलोवेरामध्ये मिसळून लावा या गोष्टी, मिळेल बेस्ट रिझल्ट

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 26, 2023 11:18 AM IST

Hair Care With Aloe Vera: एलोवेरा जेलचा वापर स्किन केअरमध्ये अधिक केला जातो. पण तुम्ही केसांच्या वाढीसाठीही वापरू शकता. केसांची ग्रोथ वाढवण्यासाठी कोरफडीचा वापर कसा करावा हे जाणून घ्या.

केसांच्या वाढीसाठी एलोवेरा
केसांच्या वाढीसाठी एलोवेरा

Aloe Vera For Hair Growth: एलोवेरा जेल आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याचे अनेक ब्युटी बेनिफिट्सही आहेत. केस गळणे, तुटणे किंवा कोंडा यासारख्या केसांशी संबंधित समस्या असल्यास तुम्ही एलोवेरा जेल वापरू शकता. काही लोकांची तक्रार असते की फक्त कोरफडीचा गर लावल्याने फायदा होत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही त्यात काही गोष्टी मिसळून लावू शकता. केसांची ग्रोथ वाढवण्यासाठी एलोवेरा जेल कसे लावायचे ते जाणून घ्या.

Grey Hair: पांढरे केस काळे करायचे? मोहरीच्या तेलात मिक्स करून लावा या २ गोष्टी

मेथीच्या दाण्यांसोबत कोरफड

केसांवर एलोवेरा लावण्यासाठी तुम्ही त्यात मेथीचे दाणे टाकू शकता. यासाठी २ चमचे मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी याची घट्ट पेस्ट बनवा. नंतर त्यात एलोवेरा जेल मिक्स करून पेस्ट बनवा.

खोबरेल तेल-मध यासोबत एलोवेरा

हेअर ग्रोथ बूस्ट करण्यासाठी दोन चमचे एलोवेरा जेल, दोन चमचे खोबरेल तेल आणि अर्धा चमचा मध एकत्र मिक्स करा. याची गुळगुळीत पेस्ट तयार झाल्यानंतर केसांना लावा.

आवळा सह एलोवेरा जेल

आवळा केसांसाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही कोरफडीच्या जेलमध्ये आवळ्याचा रस किंवा पावडर टाकू शकता. यासाठी चांगली स्मूद पेस्ट बनवा आणि नंतर केसांना लावा.

कांद्याचा रस आणि कोरफड

कांद्याचा रस केसांना लावल्याने अनेक समस्या दूर होतात. मुळांवर लावल्याने कोंडा दूर करता येतो. सोबतच हे केस गळणेही थांबते. एलोवेरा जेलमध्ये कांद्याचा रस मिक्स करा आणि नंतर केसांना लावा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग