Home Remedies For Straight Hair: लूक कोणताही असो त्यावर स्ट्रेट हेअर खुलून दिसतात. त्यामुळे मुलींना स्ट्रेट केस जास्त आवडतात. स्ट्रेट केस मिळवण्यासाठी एक तर पार्लर मध्ये जाऊन ट्रिटमेंट करतात किंवा घरीच स्ट्रेटरच्या सहाय्याने केस स्ट्रेट करतात. पण रोज किंवा नियमित असे केल्याने तुमचे केस डॅमेज होतात. तुम्हाला सुद्धा जर रोज स्ट्रेट हेअर पाहिजे तर या होम रेमेडीज तुमच्या उपयोगी पडतील. जाणून घ्या, घरच्या घरी कोणत्याही खर्चाशिवाय आणि केसांना डॅमेज न करता कशा प्रकारे केस स्ट्रेट करता येतात.
फक्त स्किनच नाही तर केसांसाठी देखील मुलतानी माती चांगली असते. केसांसाठी पॅक बनवताना मुलतानी मातीमध्ये एका अंड्यातील पांढरा भाग आणि दोन मोठे चमचे तांदळाचे पीठ मिक्स करा. यात थोडे पाणी मिक्स करून पेस्ट बनवून घ्या. चांगली कंसिस्टेंसी झाल्यावर हे केसांना लावा आणि अर्धा तासासाठी तसेच ठेवा. ३० मिनीटांनंतर केसांमध्ये हळूवार कंगवा फिरवा. आता ही पेस्ट पुन्हा लावा आणि केसांमध्ये कंगवा करा. ही प्रक्रिया एक ते दोन वेळा करा आणि नंतर केस धुवून घ्या.
हा पॅक बनवण्यासाठी एक कप दुधात एक चमचा मध मिक्स करा. यात काही स्ट्रॉबेरी मिक्स करा आणि ही पेस्ट केसांना लावा. साधारण २ ते ३ तास हे केसांना लावून ठेवा. नंतर शॅम्पू आणि कंडीशनर वापरून धुवून घ्या. उत्तम रिझल्ट साठी हे ३ ते ४ वेळा करा.
हे बनवण्यासाठी एक ग्लास नारळाचे दुधात एक मिडीयम आकाराचे लिंबाचे रस मिक्स करा. हे नीट मिक्स करा आणि किमान ३ तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळासाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या. फ्रिजमध्ये एक थोडे घट्ट होत नाही तोपर्यंत राहू द्या. घट्ट झाल्यानंतर हे ठंडे क्रिमी पेस्ट केसांना लावा. हे लावल्यानंतर केस कव्हर करून घ्या. हे कव्हर करण्यासाठी एक टॉवेल गरम पाण्यात भिजवा आणि पिळून घ्या आणि त्याने केसांना कव्हर करा. साधारण २५ ते ३० मिनीट हे असेच कव्हर करून ठेवा. नंतर शॅम्पूने धुवून घ्या आणि कंडीशनर लावायला विसरू नका. चांगल्या रिझल्ट साठी ५ ते ६ वेळा रिपीट करू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)