मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Travel Guide: भारतातील 'या' ठिकाणी बघायला पाहायला मिळतील परदेशी नजारे! ट्रिपचा करा प्लॅन

Travel Guide: भारतातील 'या' ठिकाणी बघायला पाहायला मिळतील परदेशी नजारे! ट्रिपचा करा प्लॅन

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Sep 29, 2022 11:53 AM IST

भारतातील अशा ठिकाणांबद्दल जाणून घ्या, ज्यांचे सौंदर्य परदेशातल्या ठिकाणांप्रमाणे आहे.

ट्रॅव्हल टिप्स
ट्रॅव्हल टिप्स (Freepik)

प्रवासाची आवड असलेले लोक नेहमीच नवीन ठिकाणांच्या शोधात असतात. जगात असे अनेक देश आहेत जिथे जाण्यासाठी लाखो खर्च करावे लागतात. तुम्हालाही परदेशात फिरण्याचा विचार करत असाल तर त्या आधी जाणून घ्या की, भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जी परदेशी आहेत अशी वाटतं. कमी बजेटमध्ये तुम्ही सहज परदेशाचा आनंद भारतातच घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे सौंदर्य परदेशातल्या ठिकाणांप्रमाणे आहे.

<p>गुलमर्ग</p>
गुलमर्ग (Freepik)

स्वित्झर्लंडला जाण्याचे अनेकांचे स्वप्न असते पण महागड्या तिकिटांमुळे ते शक्य होत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही कमी बजेटमध्ये काश्मीरमधील गुलमर्गला जाऊन स्वित्झर्लंडसारखा आनंद घेऊ शकता.

<p>केरळ</p>
केरळ (Freepik)

तुमचंही स्वप्न असेल तर मलेशियाला जाऊन तिथल्या बागांमध्ये चहाचा आनंद घेयचा तर ते भारतातही होऊ शकता. केरळमधील मुन्नरला जाऊन तुम्ही हे स्वप्न पूर्ण करू शकता. येथील सौंदर्य मलेशियापेक्षा कमी नाही.

<p>अंदमान</p>
अंदमान (Freepik)

अंदमान हे भारतातील अतिशय सुंदर ठिकाण आहे. येथे कमी पैशात तुम्ही सुंदर निळ्या समुद्राचा आनंद घेऊ शकता.

<p>लडाख</p>
लडाख (Freepik)

जर तुम्हाला ऑस्ट्रेलियातील उंच पर्वत पहायचे असतील तर तुम्ही भारतातील लडाखमध्ये जावे. भारतातील लडाखमध्ये तुम्हाला ऑस्ट्रेलियासारखाच आराम मिळेल.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग