मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mysuru, Coorg, Ooty Trip: सप्टेंबरमध्ये फिरण्यासाठी आयआरसीटीसीचं खास म्हैसूर-कूर्ग-उटी ट्रिप पॅकेज!

Mysuru, Coorg, Ooty Trip: सप्टेंबरमध्ये फिरण्यासाठी आयआरसीटीसीचं खास म्हैसूर-कूर्ग-उटी ट्रिप पॅकेज!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Aug 29, 2022 01:28 PM IST

RCTC Tour Package: जर तुम्ही सप्टेंबरमध्ये ट्रिपची योजना आखत असाल, तर या पॅकेजसह कमी बजेटमध्ये म्हैसूर उटी आणि कुर्गला भेट देण्याची संधी मिळत आहे.

म्हैसूर-कूर्ग-उटी टूर
म्हैसूर-कूर्ग-उटी टूर (Freepik)

हवामानात बदल होऊ लागला आहे. सप्टेंबरपासून अनेक ठिकाणी वातावरण आल्हाददायक होऊ लागते. जे हवामान प्रवासासाठी योग्य आहे. त्यामुळे तुम्ही या सीझनमध्ये कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करत असाल पण कुठे जायचे हे ठरवता येत नसेल, तर आयआरसीटीसी एक टूर पॅकेज घेऊन आले आहे जे तुम्हाला यामध्ये मदत करू शकते. चला तर मग विलंब न लावता जाणून घेऊया या टूर पॅकेजची किंमत आणि इतर महत्त्वाची माहिती...

पॅकेजचे तपशील

पॅकेजचे नाव - सेरेन म्हैसूर-कूर्ग-उटी

पॅकेजचा कालावधी - ५ रात्री आणि ६ दिवस

प्रवास मोड - फ्लाइट

कव्हर केले जाणारे डेस्टिनेशन- कोईम्बतूर, कुन्नूर, कूर्ग, म्हैसूर, उटी, बंगलोर

प्रस्थान तारीख - २९ सप्टेंबर, ३१ जानेवारी २०२३, २८ फेब्रुवारी २०२३

मिळतील 'या' सुविधा

१. मुक्कामासाठी हॉटेलची सोय असेल.

२. नाश्ता आणि २ रात्रीचे जेवण उपलब्ध असेल.

३. फिरण्यासाठी एसी बसची सुविधा उपलब्ध असेल.

४. या ट्रिपमध्ये ट्रॅव्हल इन्शोरन्सचीही सुविधा मिळेल.

प्रवासासाठी 'इतके' शुल्क लागेल

१. या ट्रिपमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला ४५,८०० रुपये मोजावे लागतील.

२. त्याच वेळी, दोन लोकांना प्रति व्यक्ती ३५,१०० रुपये शुल्क द्यावे लागेल.

३. तीन लोकांना प्रति व्यक्ती ३३,७०० रुपये फी भरावी लागेल.

४. मुलांसाठी तुम्हाला वेगळी फी भरावी लागेल. बेडसह ३१,१०० आणि बेडशिवाय २९,१०० रुपये भरावे लागतील.

'अशी' करू शकता बुकिंग

तुम्ही या टूर पॅकेजसाठी आयआरसीटीसी च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय,आयआरसीटीसी पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक तपशीलांसाठी, तुम्ही आयआरसीटीसी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

WhatsApp channel

विभाग