मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  IRCTC Goa Tour Package : गोव्याला फिरायला जाण्याची उत्तम संधी! मिळेल सर्व काही बजेटमध्ये

IRCTC Goa Tour Package : गोव्याला फिरायला जाण्याची उत्तम संधी! मिळेल सर्व काही बजेटमध्ये

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Aug 17, 2022 02:16 PM IST

Goa Trip: तुम्ही गोव्याला भेट देण्याचा विचार करत असाल तर, आयआरसीटीसी तुमच्यासाठी एक उत्तम संधी घेऊन आली आहे. ज्यामध्ये तुम्हाला दक्षिण आणि उत्तर गोव्याला भेट देण्याची संधी मिळेल.

अमेझिंग गोवा एअर पॅकेज
अमेझिंग गोवा एअर पॅकेज (unsplash)

तुम्ही केव्हाही गोव्याला भेट देण्याचा प्लॅन बनवू शकता, परंतु येथे भेट देण्याचा सर्वोत्तम हंगाम म्हणजे पावसाळ्यानंतर आणि उन्हाळा सुरू होण्यापूर्वीचा आहे. जेव्हा तिकडे हवामान खूप छान असते. त्यामुळे तुम्ही ऑक्टोबर, नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये प्रवास करण्याचा विचार करत असाल तर गोव्याला जाण्याचा यशस्वी प्लॅन करा. आयआरसीटीसीने गोव्याला भेट देण्याची एक उत्तम संधी आणली आहे, ज्यामध्ये तुम्ही फक्त २५,७३० रुपयांमध्ये दक्षिण ते उत्तर गोवा प्रवास करू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

तुम्ही 'या' ठिकाणांना देऊ शकता भेट

या पॅकेजदरम्यान, कॅलंगुट बीच, अंजुना बीच, वागेटोर बीच, उत्तर गोव्यातील फोर्ट अगुआडा आणि दक्षिण गोव्यातील बॅसिलिका ऑफ बॉम जीसस, मिरामार बीच, मांगुशी मंदिर, मांडोवी नदी क्रूझ या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल.

टूर पॅकेजचे तपशील

पॅकेजचे नाव - अमेझिंग गोवा एअर पॅकेज

डेस्टिनेशन कवर्ड - दक्षिण आणि उत्तर गोवा

पॅकेजचा कालावधी - ४ दिवस आणि ३ रात्री

प्रवास मोड - फ्लाइट

प्रस्थान तारीख- ०६ ऑक्टोबर २०२२, ०५ नोव्हेंबर २०२२ आणि १० डिसेंबर २०२२

प्रवासाची सुरुवात- लखनऊ

टूर पॅकेजची किंमत

या पॅकेजमध्ये तुम्ही एकटे फिरणार असाल तर तुम्हाला ३१,६०० रुपये द्यावे लागतील.

दोन लोकांसाठी २५,७३० रुपये शुल्क भरावे लागेल.

त्याच वेळी, तीन लोकांसाठी २५,५३० रुपये द्यावे लागतील.

कसं बुक करू शकता?

तुम्ही या टूर पॅकेजसाठी आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय आयआरसीटीसी टुरिस्ट फॅसिलिटेशन सेंटर, झोनल ऑफिस आणि रिजनल ऑफिसमधूनही बुकिंग करता येईल. पॅकेजशी संबंधित अधिक तपशीलांसाठी, तुम्ही आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

WhatsApp channel

विभाग