मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Diet For Healthier Skin: निरोगी त्वचेसाठी तुमच्या आहारात ‘या’ ५ पोषणयुक्त पदार्थांचा करा समावेश!

Diet For Healthier Skin: निरोगी त्वचेसाठी तुमच्या आहारात ‘या’ ५ पोषणयुक्त पदार्थांचा करा समावेश!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 19, 2023 11:58 AM IST

Diet For Clean And Healthier Skin: हिवाळ्यात आपली त्वचा खूप कोरडी आणि निर्जीव दिसू लागते. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी सकस आहार अत्यंत आवश्यक आहे.

स्किन केअर
स्किन केअर (Freepik )

हिवाळ्यात आपली त्वचा खूप कोरडी आणि निर्जीव दिसू लागते. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी सकस आहार अत्यंत आवश्यक आहे. खरं तर, आपल्यापैकी बहुतेक लोक निरोगी त्वचेसाठी बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांचा अवलंब करतात. पण ही उत्पादने बाहेरून त्वचा निरोगी ठेवू शकतात. पण त्वचा आतून निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला पोषक आहाराची गरज आहे. आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे पोषण आवश्यक आहे, त्याचप्रमाणे त्वचा आणि केसांसाठी पोषण आवश्यक आहे. तर, आज आम्ही तुम्हाला अशाच काही पौष्टिक पदार्थांबद्दल सांगणार आहोत, जे तुमची त्वचा निरोगी आणि आतून स्वच्छ ठेवण्यास मदत करू शकतात.

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी हे पदार्थ खा

१) बिया

जीवनसत्त्वे, खनिजे आणि निरोगी चरबी बियांमध्ये आढळतात. तुमच्या आहारात बियांचा समावेश करून तुम्ही कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह, जस्त पुरवू शकता.

२) बदाम

बदाम हा बायोटिनचा चांगला स्रोत आहे. बदामामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स देखील असतात, ज्यामुळे जळजळ कमी होते आणि त्वचा निरोगी राहते.

३) बीन्स

मटार, कडधान्ये, शेंगदाणे आणि सोयाबीन यांसारख्या शेंगा हे प्रथिने, फायबर आणि बायोटिनचे उत्तम स्रोत आहेत. तुमच्या आहारात बीन्सचा समावेश करून तुम्ही तुमची त्वचा चमकदार आणि निरोगी ठेवू शकता.

४) मशरूम

मशरूममध्ये अँटिऑक्सिडंट्ससोबत सेलेनियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे देखील असतात. आहारात ताज्या मशरूमचा समावेश करून तुम्ही त्वचा निरोगी ठेवू शकता. पण लक्षात ठेवा की तुम्हाला याची अॅलर्जी असेल तर त्याचे सेवन टाळा.

५) रताळे

रताळे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की रताळे त्वचेसाठी देखील चांगले मानले जाते. रताळ्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि कॅरोटीनोइड्स, अँटीऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग