मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Skin Care Tips: हिवाळ्यात चमकदार त्वचेसाठी 'हे' आयुर्वेदिक उपाय करून पाहा

Skin Care Tips: हिवाळ्यात चमकदार त्वचेसाठी 'हे' आयुर्वेदिक उपाय करून पाहा

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 10, 2023 11:05 AM IST

Ayurvedic Beauty Tips: झोपेचा अभाव, तणाव, चुकीचे खाणे आणि प्रदूषण यांचाही आपल्या त्वचेवर वाईट परिणाम होतो. यावर उपाय म्हणून आयुर्वेदिक स्किन केअर टिप्स फॉलो करू शकतो.

Skin Care
Skin Care (Freepik)

Ayurvedic Remedies for Glowing Skin: हिवाळ्यात निर्दोष आणि चमकदार त्वचेसाठी तुम्ही आयुर्वेदिक स्किन केअर टिप्स देखील फॉलो करू शकता. हे त्वचेशी संबंधित समस्या जसे की डाग, बारीक रेषा आणि सुरकुत्या इत्यादीपासून मुक्त होण्यास मदत करू शकते. तुम्ही कोणत्या टिप्स फॉलो करू शकता ते जाणून घ्या. आयुर्वेदाने हजारो वर्षांपासून आपली जादू सिद्ध केली आहे. आरोग्याच्या फायद्यांपासून ते सौंदर्य काळजीपर्यंत, आयुर्वेदिक उपाय सर्व समस्यांवर उपाय देतात. त्वचेची काळजी घेताना, अनेक प्रभावी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आणि झुडुपे उपयुक्त ठरतात. या घटकांचे विविध फायदे आहेत, ज्यात वृद्धत्वाची चिन्हे कमी करणे, मुरुम कमी करणे आणि तरुण त्वचेला प्रोत्साहन देणे समाविष्ट आहे. निरोगी आणि तेजस्वी त्वचेसाठी खाली दिलेलं फेसपॅक नक्कीच वापरून बघा.

केशर आणि मध

केशरमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. ते यूवी किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करतात. यासाठी एक चमचा मधात केशराचे धागे मिसळा. ते चांगले मिसळा आणि चेहरा आणि मानेवर लावा. १० मिनिटांनी चेहरा धुवा.

हळद आणि बेसन

हळद त्वचेला मुलायम आणि चमकदार बनवण्यास मदत करते. यासाठी एका भांड्यात थोडे बेसन घ्या. त्यात हळद आणि गुलाबपाणी टाका. या दोन्ही गोष्टी मिक्स करून १५ ते २० मिनिटे चेहऱ्यावर लावा. यानंतर चेहरा धुवा.

ओट्स आणि मध

एका भांड्यात २ चमचे ओटमील पावडर घ्या. त्यात थोडे मध आणि कच्चे दूध घाला. हे दोन्ही मिश्रण चेहऱ्यावर लावा. काही वेळाने चेहरा धुवा.

चंदन आणि गुलाबपाणी

चंदनामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. ते मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत करतात. हे काळे डाग दूर करण्यास मदत करतात. यासाठी एका भांड्यात २ चमचे चंदन पावडर आणि गुलाबजल मिसळा. या दोन्ही गोष्टी मिक्स करून चेहरा आणि मानेला लावा. १५ मिनिटांनी चेहरा धुवा.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग