मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Remedies for Dandruff: डँड्रफपासून सुटका हवी? अशा प्रकारे केसांना लावा खोबरेल तेल

Remedies for Dandruff: डँड्रफपासून सुटका हवी? अशा प्रकारे केसांना लावा खोबरेल तेल

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 09, 2023 05:08 PM IST

Home Treatment For Dandruff: कोंड्याच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी व्यक्ती बाजारात उपलब्ध विविध प्रकारचे शॅम्पू, तेल आणि हेअर केअर प्रोडक्ट्स वापरतात. पण तुम्ही घरच्या घरी काही उपायांनी या समस्येपासून सुटका मिळवू शकता.

डँड्रफपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय
डँड्रफपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय (unsplash)

Coconut Oil Remedies For Dandruff: अनेक वेळा धूळ, घाण, प्रदूषण आणि टाळूची त्वचा कोरडी पडल्याने केसांमध्ये कोंड्याची समस्या सुरू होते. यापासून सुटका मिळवण्यासाठी एखादी व्यक्ती बाजारात उपलब्ध असलेले विविध प्रकारचे शॅम्पू, तेल आणि हेअर केअर प्रोडक्ट्स वापरते. असे असूनही समस्या तशीच राहते आणि केस पूर्वीपेक्षा खराब होऊ लागतात. जर तुमच्या केसांमध्येही डँड्रफची समस्या असेल तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी खोबरेल तेलाचा हा प्रभावी उपाय ट्राय करा.

नारळाच्या तेलात अँटी-बॅक्टेरियल, अँटी फंगल गुणधर्म असतात, जे बॅक्टेरियांना टाळूवर वाढण्यापासून रोखतात. याशिवाय त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई, प्रोटीन, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक असतात, जे घाण साफ करण्यास आणि टाळूचे पोषण करण्यास मदत करतात. चला तर मग जाणून घेऊया डँड्रफपासून मुक्ती मिळवण्यासाठी खोबरेल तेल कसे वापरावे.

Oily Scalp: केसांची वाढ थांबवते का तेलकट टाळू? हेअर ग्रोथसाठी जाणून घ्या ही गोष्ट

खोबरेल तेल आणि लिंबू

अनेक वेळा टाळूमध्ये घाण असल्याने केसांमध्ये कोंड्याची समस्या उद्भवते. अशा परिस्थितीत या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल आणि लिंबाचा हा उपाय अवलंबू शकता. हा उपाय करण्यासाठी खोबरेल तेलात लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळून केसांना लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. अर्ध्या तासानंतर केस शॅम्पू करा. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्याने कोंडा दूर होईल.

खोबरेल तेलाचा हॉट मसाज

केसांच्या मुळांना कोमट खोबरेल तेल लावल्यानंतर डोक्याला हलक्या हातांनी १० मिनिटे मसाज करा. यानंतर अर्ध्या तासानंतर केस धुवा.

खोबरेल तेल आणि कापूर

केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी खोबरेल तेलात कापूर मिसळून लावा. खोबरेल तेलामध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म कोंड्याची समस्या दूर करण्यास मदत करतात. हा उपाय करण्यासाठी कापूरच्या दोन गोळ्या बारीक करून कोमट खोबरेल तेलात मिक्स करा. हे केसांना लावा आणि मसाज करा. एक तासानंतर केस धुवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग