मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Oily Scalp: केसांची वाढ थांबवते का तेलकट टाळू? हेअर ग्रोथसाठी जाणून घ्या ही गोष्ट

Oily Scalp: केसांची वाढ थांबवते का तेलकट टाळू? हेअर ग्रोथसाठी जाणून घ्या ही गोष्ट

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 06, 2023 11:14 AM IST

Hair Growth Tips: उन्हाळ्यात चिकट केस आणि टाळू तुमचा लूक खराब होतो. पण तेलकट टाळू केसांची वाढ थांबवते का? जाणून घ्या केसांच्या वाढीशी संबंधित ही गोष्ट.

ऑइली स्काल्प
ऑइली स्काल्प

Does Oily Scalp Stop Hair Growth: उन्हाळ्यात केस आणि त्वचा लवकर तेलकट होतात. अशा वेळी त्वचेवर पुरळ येते. दुसरीकडे केस तेलकट झाले की तुटायला लागतात. अशा परिस्थितीत टाळूच्या स्वच्छतेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. काही लोक मानतात की चिकट केसांमुळे केसांची वाढ थांबते. येथे जाणून घ्या केसांच्या वाढीशी संबंधित ही गोष्ट.

Hair Mask: केसांना हेअर मास्क लावण्याची काय आहे पद्धत? जाणून घ्या योग्य स्टेप्स

तेलकट टाळू लांब केसांसाठी वाईट आहे का?

आपले केसांचे फोलिकल्स वसामय ग्रंथींनी वेढलेले असतात. सीबमच्या जास्त उत्पादनामुळे छिद्रांमध्ये अडथळा, सूज आणि राठ होतात. त्यामुळे केस गळायला लागतात आणि पातळ होतात. तेलकट टाळूमुळे केस लवकर गळतात.

ऑइली स्काल्पला तेल लावण्याची गरज आहे का?

तेलकट टाळू असलेल्या केसांना तेल लावणे टाळा. परंतु तुमचे केस कोरडे आणि टाळू तेलकट असल्यास तेल लावल्याने फायदा होणार नाही. कारण त्यामुळे छिद्रे बंद होऊ शकतात. एलोवेरा जेल लावणे हा कोरड्या केसांचा सामना करण्याचा सर्वोत्तम मार्गआहे. कारण ते स्काल्पला आराम देते आणि केसांना स्निग्ध किंवा चिकट न करता मऊ करते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel