प्रत्येक भारतीय घरात दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात चपाती खाण्यास प्राधान्य दिले जाते. चपाती पौष्टिकही असते. पण अनेकदा चपाती जास्त बनते जास्तीच्या चपात्या फेकून द्यावंसंही वाटत नाही. म्हणून आम्ही या समस्येवर उपाय सांगणार आहोत. उरलेल्या चापात्यापासून तुम्ही समोसे बनवू शकता. समोसे खायला जवळपास सगळ्यांनाच आवडतात. पण त्याच कव्हर मैद्याचं असतं त्यामुळे अनेकजण हा पदार्थ खायला टाळाटाळ करतात. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही उरलेल्या चपातीपासून समोसे बनवाल तेव्हा ते खायला खूप चविष्ट लागतील आणि ते खाल्ल्यास जास्त नुकसान होणार नाही. चला तर मग, उशीर न करता, उरलेल्या चपातीमधून समोसे कसे बनवायचे ते जाणून घ्या.
ब्रेड - ४
उकडलेले बटाटे - २-३
बेसन - ३ टीस्पून
हिरवी मिरची चिरलेली - २
लाल तिखट - १/२ टीस्पून
गरम मसाला - १/२ टीस्पून
कलोंजी - १/२ टीस्पून
कोथिंबीर - २-३ चमचे
तेल - तळण्यासाठी
मीठ - चवीनुसार
चपाती समोसे बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे उकडून थंड करून घ्या. आता ते सोलून चांगले मॅश करा. यानंतर एका कढईत तेल टाका, त्यात बडीशेप आणि हिरव्या मिरच्या घालून काही सेकंद परतून घ्या. यानंतर, मॅश केलेले बटाटे पॅनमध्ये ठेवा आणि चमच्याच्या मदतीने ढवळत असताना तळून घ्या. काही मिनिटे चांगले तळून घ्या. यानंतर, आता त्यात सर्व मसाले आणि मीठ घालून चांगले मिसळा. ते तयार झाल्यावर त्यावर कोथिंबीर टाका. आता ते बाजूला ठेवा आणि थंड करा.
समोसे चिकटवण्यासाठी बेसनाचे जाडसर पीठ तयार करा. यानंतर चपाती मधोमध कापून घ्या. आता एक तुकडा घ्या आणि त्यातून एक समोसाचा आकार बनवून त्यात बटाटा भरून घ्या. शेवटी बेसनाच्या द्रावणाच्या मदतीने चिकटवा. आता कढईत तेल गरम करून त्यात चपाती समोसे तळून घ्या. गरमागरम चटणीसोबत सर्व्ह करा.