मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  संध्याकाळचा नाश्ता बनवायचा असेल स्पेशल तर ट्राय करा तंदूरी मशरूमची ही टेस्टी रेसिपी

संध्याकाळचा नाश्ता बनवायचा असेल स्पेशल तर ट्राय करा तंदूरी मशरूमची ही टेस्टी रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 31, 2023 05:12 PM IST

Evening Snacks Recipe: संध्याकाळी स्नॅक्समध्ये नेहमीचे पदार्थ न खाता काहीतरी वेगळं खायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करु शकता. तंदूरी मशरूमची ही रेसिपी देईल तुम्हाला रेस्टॉरंटची टेस्ट.

तंदूरी मशरूम
तंदूरी मशरूम

Tandoori Mushroom Recipe: जर तुम्ही मशरूमचे शौकीन असाल, तर संध्याकाळी तुमची भूक भागवण्यासाठी आणि तुमच्या टेस्ट बडला ट्रीट देण्यासाठी तुम्ही तंदूरी मशरूमची ही टेस्टी रेसिपी ट्राय करु शकता. ही स्टार्टर रेसिपी खायला खूप चविष्ट तर आहेच पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. विशेष म्हणजे ही रेसिपी पटकन तयार होणारी आहे. अशा परिस्थितीत चला जाणून घेऊया कशी बनवली जाते तंदूरी मशरूमची ही रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी.

ट्रेंडिंग न्यूज

तंदूरी मशरूम बनवण्यासाठी साहित्य

- ५०० ग्रॅम मशरूम

- १०० ग्रॅम चीज

- ३ टीस्पून दही

- ४ टीस्पून फ्रेश क्रीम

- १ टीस्पून आले-लसूण पेस्ट

- ४ टीस्पून लाल तिखट

- १/२ टीस्पून धने पावडर

- १/२ टीस्पून गरम मसाला

- ३ टेबलस्पून तेल

- चवीनुसार मीठ

तंदूरी मशरूम बनवण्याची पद्धत

तंदूरी मशरूम बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात मशरूम, दही, चीज, आले-लसूण पेस्ट, सर्व मसाले, मीठ, तेल आणि फ्रेश क्रीम घालून चांगले मिक्स करा. आते हे १५ मिनिटे बाजूला ठेवा. यानंतर मॅरीनेट केलेल्या मशरूमला बार्बेक्यू स्टिकला लावून ग्रिल करा. तुमचे चविष्ट तंदूरी मशरूम तयार आहे. हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करा. अगदी झटपट होणारी ही रेसिपी स्टार्टर म्हणून देखील सर्व्ह करता येते.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग