मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  संध्याकाळच्या चहासोबत बनवा टेस्टी पोहे पकोडे, इव्हनिंग स्नॅक्ससाठी परफेक्ट आहे ही पंजाबी रेसिपी

संध्याकाळच्या चहासोबत बनवा टेस्टी पोहे पकोडे, इव्हनिंग स्नॅक्ससाठी परफेक्ट आहे ही पंजाबी रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 24, 2023 07:02 PM IST

संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी चटपटीत खायची इच्छा असेल तर ट्राय करा ही पंजाबी रेसिपी. नेहमीच्या भज्यांपेक्षा टेस्टी असणारे हे पोहे पकोडे बनवायला खूप सोपी आहेत.

पोहे पकोडे
पोहे पकोडे

Pohe Pakode Recipe: जेव्हाही झटपट हेल्दी ब्रेकफास्टचा विषय निघतो तेव्हा सर्वात आधी पोह्याचे नाव येते. पण जर तुम्हाला रोज पोहे खाण्याचा कंटाळा येत असेल तर पोह्यांपासून बनवलेला हा वेगळा आणि चविष्ट नाश्ता करून पहा. पोहा पकोड्यांची ही चविष्ट पंजाबी रेसिपी तयार होण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. ही रेसिपी खायला चविष्ट तर आहेच पण बनवायलाही खूप सोपी आहे. तुम्ही संध्याकाळी चहासोबत या रेसिपीचा आस्वाद घेऊ शकता.

पोहे पकोडे बनवण्यासाठी साहित्य

- पोहे - दीड कप

- उकडलेले बटाटे - २-३

- हिरवी मिरची - १-२

- लिंबाचा रस - १ टीस्पून

- कोथिंबीर - २ चमचे

- लाल तिखट - १/२ टीस्पून

- जिरे - १/२ टीस्पून

- साखर - १/२ टीस्पून

- तेल - तळण्यासाठी

- मीठ - चवीनुसार

पोहे पकोडा बनवण्याची पद्धत

पोहे पकोडे बनवण्यासाठी प्रथम पोहे स्वच्छ करून चाळणीत ठेवा आणि पाण्याने धुवा. यानंतर पोहे थोडा वेळ बाजूला ठेवा. यानंतर उकडलेल्या बटाट्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि हिरवी कोथिंबीर घातल्यानंतर एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये मॅश केलेले बटाटे आणि भिजवलेले पोहे एकत्र करा. आता या मिश्रणात लाल तिखट, जिरे, साखर, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सर्व साहित्य घालून चांगले मिक्स करा. अशा प्रकारे पकोड्यांची पेस्ट तयार होईल. आता कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात पोह्याचे मिश्रण पकोड्याच्या आकारात टाकून तळून घ्या. कढईत पकोडे टाकल्यावर २-३ मिनिटे परतून घ्या. पकोडे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. यानंतर एका प्लेटमध्ये पकोडे काढा आणि गरमागरम सॉस आणि चहासोबत सर्व्ह करा.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या