मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Samosa Recipe: नाश्त्यात बनवा स्ट्रीट स्टाईल गरमा गरम समोसे, चहाची मजा होईल द्विगुणीत

Samosa Recipe: नाश्त्यात बनवा स्ट्रीट स्टाईल गरमा गरम समोसे, चहाची मजा होईल द्विगुणीत

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 01, 2023 05:51 PM IST

Tea Time Snacks: जर तुम्हालाही घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल समोसे चाखायचे असतील तर ही सोपी रेसिपी ट्राय करा. ही रेसिपी बनवायला जितकी सोपी आहे तितकीच खायला चविष्ट आहे.

समोसे
समोसे (unsplash)

Street Style Samosa Recipe: संध्याकाळच्या चहासोबत गरमा गरम समोसे खायला सगळ्यांनाच आवडतात. पण अनेकदा महिलांची तक्रार असते की घरी बनवलेले समोसे बाजारातील समोसे तितके टेस्टी होत नाही. जर तुम्हालाही घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल समोसे खायचे असतील तर ही सोपी रेसिपी ट्राय करा. ही रेसिपी बनवायला जितकी सोपी आहे तितकीच खायला चविष्ट आहे. चला तर मग जाणून घेऊया कसे बनवायचे स्ट्रीट स्टाईल समोसे.

- १/२ किलो पीठ

- ५० मिली. तेल

- ५ ग्रॅम ओवा

- चवीनुसार मीठ

- पाणी

- तळण्यासाठी तेल

तडक्यासाठी

- १०० ग्रॅम हिरवे वाटाणे

- ५० मिली तेल

- ५ ग्रॅम जिरे

- ५ ग्रॅम हळद

- १० ग्रॅम चाट मसाला

- ५ ग्रॅम गरम मसाला

- ३ ग्रॅम लाल मिरची

- १० ग्रॅम हिरवी मिरची

- १० ग्रॅम आले

- १० ग्रॅम लसूण

- १ लिंबू

- १० ग्रॅम कोथिंबीर

- ५ ग्रॅम बडीशेप

- मीठ

Evening Snacks साठी परफेक्ट आहे ब्रेड एग रोल, नोट करा अप्रतिम रेसिपी

समोसे बनवण्याची सोपी पद्धत

स्ट्रीट स्टाईल समोसे बनवण्यासाठी प्रथम उकडलेले बटाटे सोलून मॅश करा. आता हिरवी मिरची, लसूण, आले आणि कोथिंबीर कापून वेगवेगळे ठेवा. आता एका बाऊलमध्ये पीठ घेऊन त्यात ओवा, मीठ, आणि थोडे तेल घाला. नीट मिक्स करा. आता थोडे थोडे पाणी टाका आणि घट्ट पीठ मळून घ्या आणि १० मिनिटे बाजूला ठेवा.

आता एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे टाका. नंतर त्यात लसूण घालून परतून घ्या. आता तडक्याचे उर्वरित साहित्य टाकून मिक्स करा आणि आणखी पाच मिनिटे भाजून घ्या. आता हे मिश्रण मॅश केलेल्या बटाट्यात मिक्स करा. यानंतर पिठाचा छोटे छोटे गोळे करा. एका गोळा घेऊन पुरीसारखं लाटून घ्या. अर्धा गोल करण्यासाठी मधून कापून घ्या. यानंतर अर्ध्या गोल पिठाच्या काठावर पाणी लावून हातात धरून दोन्ही कडा जोडून त्रिकोणी आकार तयार करा. आता बटाट्याचे मिश्रण मध्यभागी ठेवा आणि वरचा भाग बंद करा. असे सर्व समोसे तयार करून घ्या. 

Idli Recipe: नाश्त्यात मॅकरोनी इडलीने बनवा रविवार खास, खूप सोपी आहे ही रेसिपी

समोसे गरम तेलात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. तुमचे चविष्ट समोसे तयार आहेत. त्यांना पुदिना किंवा चिंचेच्या चटणीसोबत गरमा गरम सर्व्ह करा.

WhatsApp channel