मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Dum Aloo Recipe: रात्रीच्या जेवणासाठी झटपट बनवा बटाट्याची ही भाजी, सगळे खातील आवडीने

Dum Aloo Recipe: रात्रीच्या जेवणासाठी झटपट बनवा बटाट्याची ही भाजी, सगळे खातील आवडीने

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 16, 2023 07:53 PM IST

Recipe for Dinner: रोज रात्री काय बनवायचे हा मोठा प्रश्न महिलांसमोर असतो. तुम्हालाही हा प्रश्न असेल तर बटाट्याची ही भाजी झटपट बनवा. सगळेच आवडीने खातील.

दम आलू
दम आलू

Dum Aloo Recipe: डिनरमध्ये काहीतरी स्पायसी खायची इच्छा असेल तर बटाट्याच्या भाजीची ही रेसिपी नक्की ट्राय करा. दम आलूसारखीच असणारी ही भाजी झटपट बनते. रात्री जेवणात पोळी, पराठा किंवा भातासोबत ही भाजी खाऊ शकता. बटाट्याची ही भाजी फक्त खायला टेस्टी नाही तर ही झटपट तयार होते.

- टोमॅटो

- कांदा

- आले लसून पेस्ट

- हिरवी मिरची

- कोथिंबीर

- वेलची

- तमालपत्र

- काळी मिरी

- लवंग

- मोठी वेलची

- गरम मसाला

- तिखट

- हळद

- मीठ

- धने पावडर

- हिंग

- जिरे

- तेल

Mango Kulfi: आंबा प्रेमींनी जरूर ट्राय करावी ही मँगो कुल्फीची रेसिपी, आहे खूप सोपी

दम आलूची भाजी बनवण्याची पद्धत

बटाट्याची ही भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम छोटे बटाटे सोलून घ्या आणि त्यात काट्याने किंवा चाकूने छिद्र करा. जर घरी छोटे बटाटे नसतील तर तुम्ही बटाट्याचे मोठे मोठे तुकडे देखील करू शकता. आता ते तेलात किंवा तुपात मीठ घालून तळून घ्या. गोल्डन ब्राऊन झाल्यावर काढून एका बाजूला ठेवा. आता पॅन किंवा कुकर मध्ये तेल घ्या. तेल गरम झाल्यावर त्यात हिंग, जिरे टाका. नंतर तमालपत्र, वेलची, काळे मिरे असे सर्व खडा मसाला टाका. आता आले लसून पेस्ट टाका. हे थोडे भाजल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा टाका. कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यावर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाका. आता यात तिखट, हळद, मिठ, धने पावडर, गरम मसाला टाका. सर्व मसाले नीट भाजून घ्या. हे मसाल्यातून तेल सुटले की मग यात तळलेले बटाटे टाका. थोडे पाणी टाका. आता भाजी झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजवा.

Missi Roti बनवण्याची आहे ही नवीन पद्धत, लंच असो वा डिनर झटपट होईल तयार

जर तुम्हाला भाजी लवकर बनवायची असेल तर तुम्ही ते कुकर मध्ये बनवू शकता. कुकर मध्ये भाजी फोडणी द्या आणि थोडे पाणी टाकून कुकर बंद करा आणि 2 शिट्ट्या घ्या. भाजी तयार झाल्यावर गॅस बंद करून त्यात काही थेंब लिंबू, कोथिंबीर आणि कसूरी मेथी टाका. गरमा गरम भाजी पोळी, पराठे किंवा भातासोबत सर्व्ह करा.

WhatsApp channel

विभाग