मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Pakode Recipe: धुलिवंदनचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी बनवा क्रिस्पी मूग डाळ पकोडे

Pakode Recipe: धुलिवंदनचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी बनवा क्रिस्पी मूग डाळ पकोडे

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 01, 2023 06:40 PM IST

Holi Special Snacks: तुम्हालाही तुमच्या होळी पार्टीची मजा द्विगुणित करायची असेल तर घरी आलेल्या पाहुण्यांना मूग डाळ पकोडे सर्व्ह करा. पहा झटपट तयार होणारी ही रेसिपी.

मूग डाळ पकोडे
मूग डाळ पकोडे (freepik)

Crispy Moong Dal Pakode Recipe: देशभरात ८ मार्च रोजी होळीचा सण साजरा केला जाणार आहे. हा दिवस खास बनवण्यासाठी लोक अनेक दिवस आधीच घरी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवायला सुरुवात करतात. तुम्हालाही तुमच्या होळी पार्टीची मजा द्विगुणित करायची असेल तर घरी आलेल्या पाहुण्यांना मूग डाळ पकोडे सर्व्ह करा. हे पकोडे पटकन तयार तर होतातच पण खायलाही खूप टेस्टी असतात.

मूग डाळ पकोडे बनवण्यासाठी साहित्य

- २०० ग्रॅम मूग डाळ

- अर्धा वाटी हिरवा किंवा साधा चिरलेला कांदा

- ३- ४ चिरलेली हिरवी मिरची

- १ इंच तुकडा चिरलेले आले

- चिरलेली कोथिंबीर

- १- २ चिमूट हिंग

- १/४ टीस्पून लाल मिरची

- १ टीस्पून धने पावडर

- चवीनुसार मीठ

- तळण्यासाठी तेल

मूग डाळ पकोडे बनवण्याची कृती

मूग डाळ पकोडे बनवण्यासाठी प्रथम हिरवी सालाची मूग डाळ ४-५ तास पाण्यात भिजत ठेवा. यानंतर ही डाळ हाताने मॅश करून त्याची साल वेगळी करा. आता या डाळीतील पाणी काढून टाका. ही डाळ पाण्याशिवाय मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. ही डाळ बारीक करताना खूप कमी पाणी वापरावे लागेल हे लक्षात ठेवा. आता डाळ एका मोठ्या भांड्यात ठेवा आणि सर्व मसाले आणि डाळ चांगले मिक्स करुन फेटून घ्या. आता एका कढईत तेल गरम करून त्यात मूग डाळचे पकोडे टाका. पकोडे तेलात सोनेरी तपकिरी झाल्यावर प्लेटमध्ये काढून हिरवी चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा.

WhatsApp channel