How to make Chole Roll: सकाळचा नाश्ता हा फार महत्त्वाचा असतो. पण नाश्त्यात नेहमीचे पदार्थ नको वाटतात. मग अशावेळी आपण काही तरी हटके पदार्थ शोधतो. असाच एक हटके पदार्थाची रेसिपी आम्ही घेऊन आलो आहोत. तुम्ही नाश्त्यात छोले रोल बनवू शकता. लहान मुले किंवा प्रौढ सर्वांनाच हे छोले रोल आवडतील. हि एक हेल्दी रेसिपी आहे. चला जाणून घेऊयात रेसिपी.
छोले , ब्रेड स्लाइस, मैदा, चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, गरम मसाला, चाट मसाला, काळी मिरी पावडर, सुकी कैरी पावडर, तेल आणि चवीनुसार मीठ
छोले रोल बनवण्यासाठी प्रथम छोले स्वच्छ करा. त्यानंतर ७-८ तास पाण्यात भिजत ठेवा. छोले पाण्यातून काढून पुन्हा दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवावेत. यानंतर प्रेशर कुकरमध्ये छोले टाका, कुकरमध्ये दोन ग्लास पाणी आणि थोडे मीठ मिसळा आणि झाकून ठेवा. यानंतर छोले शिजवण्यासाठी ठेवा. यानंतर, एक शिट्टी झाल्यावर कुकरचे झाकण उघडा आणि १५-१० मिनिटे छोले तसाच शिजू द्या. छोले उकळून पूर्ण शिजल्यावर गॅस बंद करून कुकरमधून छोले एका भांड्यात काढून थंड होण्यासाठी ठेवा. छोले थंड झाल्यावर चांगले मॅश करा आणि एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये ठेवा. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि हिरवी कोथिंबीर घाला. त्यानंतर त्यात आमचूर पावडर, चाट मसाला, काळी मिरी पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घाला. आता रोलसाठी हे स्टफिंग तयार आहे.
आता एका भांड्यात मैदा घ्या, त्यात थोडे पाणी घाला आणि जाडसर पेस्ट तयार करा. रोल चिकटवण्यासाठी पिठाचा वापर केला जाईल. आता ब्रेड स्लाईस घेऊन त्याच्या चारही बाजू कापून घ्या. यानंतर ब्रेडला रोलिंग पिनने रोल करा. आता ब्रेड स्लाईस घेऊन त्यात तयार सारण भरा, चारही कोपऱ्यांवर पीठ लावून लाटून घ्या. दुमडल्यानंतर पुन्हा एकदा पिठाच्या द्रावणाने रोल चिकटवा. आता कढईत तेल गरम करून त्यात रोल टाका. कढईत रोल घालून मंद आचेवर तळून घ्या. रोलचा रंग सोनेरी होईपर्यंत तळा. सतत फिरवून तळून घ्या. छोले रोल सोनेरी झाल्यावर प्लेटमध्ये काढा. त्याचप्रमाणे सर्व छोले रोल तयार करून तळून घ्या. सॉस किंवा चटणी सोबत हे रोल सर्व्ह करा.
संबंधित बातम्या