मराठी बातम्या  /  Lifestyle  /  How To Make Chana Dal Mathari Recipe At Home

Mathari Recipe: चणा डाळीपासून बनवा कुरकुरीत मठरी, चहाची मजा होईल द्विगुणीत

मठरी
मठरी (freepik)
Hiral Shriram Gawande • HT Marathi
Mar 15, 2023 06:26 PM IST

Crispy Mathari: संध्याकाळच्या चहासोबत क्रिस्पी मठरी खायला चांगली लागते. मैदा ऐवजी तुम्ही चणा डाळीपासून मठरी बनवू शकता. जाणून घ्या कसे बनवावे.

Chana Dal Mathari Recipe: संध्याकाळी चहा, कॉफी सोबत काहीतरी स्नॅक्स खायची क्रेविंग होते. नेहमीचे पदार्थ खायचा कंटाळा आला असेल किंवा गरम नाश्ता बनवायला वेळ नसेल तर तुम्ही मठरी बनवून ठेवू शकता. मैदाची खस्ता मठरी तर तुम्ही नेहमीच खाल्ली असेल. यावेळी ट्राय करा चणा डाळीची क्रिस्पी मठरी. याची टेस्ट एकदम वेगळी असून, ती सगळ्यांना आवडेल. जाणून घ्या चणा डाळीपासून मठरी बनवण्याची रेसिपी.

ट्रेंडिंग न्यूज

चना डाळ मठरी बनवण्यासाठी साहित्य

- १०० ग्रॅम हरभरा डाळ

- तेल ४ मोठे चमचे

- मैदा २५० ग्रॅम

- हळद अर्धा चमचा

- जिरे एक चमचा

- ओवा एक चमचा

- कसुरी मेथी एक चमचा

- तळण्यासाठी तेल

मठरी बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम हरभरा डाळ धुवून भिजवावी. सुमारे दोन तासांनंतर, जेव्हा ते फुगतात तेव्हा त्यांना पाण्यातून बाहेर काढा आणि गाळून घ्या. आता कुकर गॅसवर ठेवा आणि दोन चमचे तेल घाला. त्यात चाळलेली भिजवलेली हरभरा डाळ टाकून भाजून घ्या. भिजवलेली डाळ तेलात चांगली भाजून घ्यावी. साधारण दोन मिनिटे भाजल्यानंतर त्यात अर्धा कप पाणी घालून कुकरचे झाकण बंद करून शिजवा. एक-दोन शिट्ट्या येऊ द्या. नंतर गॅस मंद करून चार ते पाच शिट्ट्या करून शिजवा. कुकर थंड झाल्यावर डाळ एका भांड्यात काढून घ्या.

मठरीचे पीठ कसे बनवायचे

मठरीचे पीठ बनवण्यासाठी एका भांड्यात हरभरा डाळ मॅश करा. त्यात दोन वाट्या मैदा घाला. सोबत मीठ, ओवा, जिरे, हळद, कसुरी मेथी घाला. त्यात दोन ते तीन चमचे तेल घालून चांगले मिक्स करा आणि पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. मळलेले पीठ सुमारे १५ मिनिटे सेट करण्यासाठी सोडा.

मठरी बनवण्याची पद्धत

मठरी बनवण्यासाठी पीठाचे चार भाग करा आणि पातळ मोठी पोळी लाटून घ्या. नंतर कुकी कटरच्या साहाय्याने मठरीस गोल आकारात कापून घ्या. सर्व मठरी त्याच प्रकारे कापून घ्या. आता कढईत तेल गरम करून त्यात मठरी घाला. मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत तळा. तुमची चविष्ट क्रिस्पी चणा डाळ मठरी तयार आहे.