मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cooking Tips : कॅफे स्टाईल कॉफी बनवू शकता घरी, फक्त फॉलो करा या बेसिक टिप्स

Cooking Tips : कॅफे स्टाईल कॉफी बनवू शकता घरी, फक्त फॉलो करा या बेसिक टिप्स

Hiral Shriram Gawande HT Marathi
Nov 02, 2022 07:04 PM IST

Basic Cooking Tips : कॉफी पिण्यासाठी आता कॅफे मध्ये जाण्याची गरज नाही. तर तशीच कॉफी तुम्ही घरी बनवू शकता. त्यासाठी फॉलो करा या बेसिक टिप्स.

कॅफे स्टाईल कॉफी
कॅफे स्टाईल कॉफी

Tips to Make Cafe Style Coffee : एखाद्या कॅफे मधली कॉफी आवडली की आपण त्याच कॅफेमध्ये पुन्हा पुन्हा कॉफी घेण्यासाठी जातो. याचे कारण कॅफे सर्वोत्तम आहे असे नाही, तर तेथे कॉफी खूप चांगली आहे आणि तुम्ही कॉफी प्रेमी आहात. तुम्हालाही घरी कॅफे स्टाईल कॉफी बनवायची असेल तर काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही घरी कॉफी बनवू शकता. चला, जाणून घ्या कोणत्या टिप्स फॉलो करायच्या

ट्रेंडिंग न्यूज

फ्रेश कॉफी

सर्वप्रथम तुम्ही फ्रेश कॉफी खरेदी करावी. कॉफी खरेदी करताना कॉफी ताजी आहे की नाही हे काळजीपूर्वक तपासा. फ्रेश कॉफी तुमची कॉफी चविष्ट बनवू शकते. भेसळ न करता फक्त ताजी कॉफी खरेदी करा.

पाणी आणि दुधाचे योग्य प्रमाण

जर तुमच्या कॉफीमध्ये जास्त पाणी असेल, तरी देखील तुमची कॉफी चवदार होणार नाही. त्याच वेळी, जर जास्त दूध असेल तर कॉफीची टेस्ट चांगली येत नाही. अशा परिस्थितीत कॉफी बनवताना पाणी आणि दूध यांचे योग्य प्रमाण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

साखरेचा योग्य वापर

जर तुम्ही कॉफीमध्ये जास्त साखर टाकली तर यातूनही तुम्हाला कॉफीची योग्य टेस्ट घेता येणार नाही. अशा परिस्थितीत, कॉफीच्या स्ट्राँग टेस्टसाठी कपमध्ये योग्य प्रमाणात साखर घालणे खूप महत्वाचे आहे.

कॉफी पावडर

कॉफीची चव वाढवण्यासाठी, कॉफी बनल्यानंतर त्यावर कॉफी पावडर शिंपडणे देखील खूप महत्वाचे आहे. यामुळे कॉफीची चव वाढेल आणि कॅफे स्टाईल चव आणि सुगंधी कॉफी तयार होईल.

 

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग