मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Gud Sharbat Recipe: गुळाचे सरबत कडक उन्हात देईल थंडावा! जाणून घ्या रेसिपी आणि फायदे

Gud Sharbat Recipe: गुळाचे सरबत कडक उन्हात देईल थंडावा! जाणून घ्या रेसिपी आणि फायदे

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Apr 22, 2023 01:07 PM IST

Gud sharbat Benefits: गुळाचे सरबत आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. विशेष म्हणजे यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता देखील दूर होते.

गुळाचे सरबत
गुळाचे सरबत (Freepik )

उन्हाळ्यात गुळाचे सरबत पोटासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानले जाते. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे बनवायला खूप सोपे आहे आणि तुम्ही ते बनवून तुमच्या फ्रीजमध्ये ठेवू शकता. वास्तविक गुळाचे सरबत पिणे हा शरीरातील तापमान संतुलित ठेवण्याचा एक मार्ग असू शकतो. याशिवाय उन्हाळ्यात पोटाचा त्रासही वाढतो, अशावेळी या शरबताचे सेवन अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. तसेच उन्हाळ्यात गुळाचे सरबत पिण्याचे अनेक फायदे आहेत. पण त्याआधी गुळाचे सरबत बनवण्याची पद्धत जाणून घेऊया.

बघा रेसिपी

गुळाचे सरबत करण्यासाठी भांड्यात पाणी घ्या.

आता त्यात गूळ भिजवून चांगले मिसळा.

गूळ विरघळल्यावर चाळणीतून गाळून घ्या. 

आता त्यात भिजवलेला सब्जा टाका.

आता वर लिंबाचा रस मिसळा.

आता पुदिन्याची पाने बारीक करून मिक्स करा.

नंतर त्यात बर्फ टाकून प्या.

गूळ शरबताचे फायदे

१. उष्माघातापासून संरक्षण करते

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी गुळाचे सरबत उपयुक्त आहे. हे शरबत प्यायल्याने शरीराचे तापमान संतुलित राहते आणि अचानक उष्मा आणि थंडीचा त्रास होत नाही. याशिवाय, गुळाचे सरबत प्यायल्याने शरीराचे पीएच संतुलित राहण्यास आणि वाढत्या आणि घसरत्या तापमानात ते निरोगी राहण्यास मदत होते.

२. लोहाची कमतरता दूर करते

लोहाची कमतरता दूर करण्यासाठी गुळाचे सरबत पिणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. वास्तविक, गुळात भरपूर लोह असते ज्यामुळे शरीरातील अशक्तपणा दूर होतो. त्यामुळे जर तुम्हाला अॅनिमिया असेल तर तुम्ही गुळाचे सरबत प्यावे.

३. लिव्हर डिटॉक्समध्ये उपयुक्त आहे

दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर गुळाचे सरबत प्यायल्याने पाचक एंझाइम सक्रिय होतात आणि बद्धकोष्ठता टाळते. पण खास गोष्ट म्हणजे ते लिव्हर डिटॉक्स करते आणि शरीर स्वच्छ करते. याशिवाय, त्यातील पोटॅशियम शरीरात हायड्रेशन वाढवण्यास आणि स्नायूंच्या वाढीस मदत करते. अशा प्रकारे हे सरबत शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel