Health Care Tips: आपल्या शरीराला चालवण्यासाठी निरोगी ठेवण्यासाठी जीवनसत्त्वे, खनिजे, कॅल्शियम, प्रथिने अशा अनेक पोषक तत्वांची आवश्यकता असते. कोणतेही पोषक तत्व कमी झाल्यास आजार होतात. पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे, आपल्या शरीरात आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दिसू लागतात. असाच एक पोषक घटक म्हणजे व्हिटॅमिन बी १२, जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे शरीराच्या सामान्य कार्यांमध्ये अडथळे येतात. हृदयाचे ठोके जलद होणे, चिंताग्रस्त वाटणे, लाल रक्तपेशींचा आकार वाढणे, जास्त झोप लागणे, मज्जासंस्थेशी संबंधित समस्या या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतात.
> व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे अनेकदा तोंडात अल्सरची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे खाण्यापिताना त्रास होऊ शकतो. त्यामुळे, तुमच्या तोंडात वारंवार अल्सर होत असल्यास, तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता असू शकते.
> व्हिटॅमिन बी १२ जीवनसत्त्वाची कमतरता दीर्घकाळ राहिल्यास मज्जासंस्था आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. म्हणून, त्याचे प्रमाण शरीरात समान प्रमाणात असणे आवश्यक आहे. बहुतेक शाकाहारी लोकांना व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेचा धोका असतो. मात्र, त्याची कमतरता काही शाकाहारी पदार्थांनीही टाळता येते. व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो आणि कोणत्या पदार्थांनी त्याची कमतरता भरून काढली जाऊ शकते हे जाणून घेऊया.
> मांस, मासे आणि चिकन
व्हिटॅमिन बी १२ पुरेशा प्रमाणात मांस, मासे आणि चिकनमध्ये आढळते. हे व्हिटॅमिन बी १२ चे सर्वोत्तम स्त्रोत आहेत. याला तुमच्या डाएटचा भाग बनवा.
> अंडी
अंडी देखील व्हिटॅमिन बी १२ चा चांगला स्रोत आहे. रोजच्या आहारात अंड्याचा समावेश करा.
काही शाकाहारी आहार देखील व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेवर मात करण्यास मदत करू शकतात, जसे की डाळी, सोया उत्पादने, काळे, ब्रोकोली आणि दूध.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या