मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cooking Tips: तेल न वापरता बनवा 'हे' ३ टेस्टी हेल्दी स्नॅक्स; हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी आहे बेस्ट

Cooking Tips: तेल न वापरता बनवा 'हे' ३ टेस्टी हेल्दी स्नॅक्स; हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी आहे बेस्ट

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Oct 04, 2022 11:45 AM IST

Oil Free Snacks: हे स्नॅक्स टेस्टला खूप चवदार तर असतातच पण बनवायलाही खूप सोपे असतात.

कुकिंग टिप्स
कुकिंग टिप्स (Freepik)

अनेकदा फिटनेस फ्रिक लोक कमी तेल असणारे किंवा तेल नसलेलेच पदार्थ खाण्यावर भर देतात. जर तुम्हीही आरोग्याबाबत जागरूक असाल आणि तुमच्या जेवणात स्वयंपाकाच्या तेलाचा वापर कमी करायचा असेल तर तुम्ही अशा काही रेसिपी ट्राय करू शकता. तुमच्या आहारात या चवदार आरोग्यदायी स्नॅक्स रेसिपीचा समावेश करू शकता. हे स्नॅक्स खायला खूप चवदार तर असतातच पण बनवायलाही खूप सोपे असतात. चला तर मग क्षणाचाही विलंब न लावता जाणून घेऊया हे ऑईल फ्री स्नॅक्स काय आहेत आणि ते कसे बनवले जातात.

ट्रेंडिंग न्यूज

हरियाली पनीर

हरियाली पनीर बनवण्यासाठी प्रथम हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पुदिन्याची पाने आणि लिंबाचा रस मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. आता पेस्टमध्ये आले आणि लसूण पेस्ट, चाट मसाला, हळद, काळे मीठ आणि घट्ट दही घालून मिक्स करा. या पेस्टमध्ये पनीरचे तुकडे मिसळा आणि ४-६ तास फ्रीजमध्ये ठेवा. ठरलेल्या वेळेनंतर मॅरीनेट केलेले पनीर स्टिक्समध्ये ठेवून बेकिंग ट्रेवर ठेवा आणि १८० अंशांवर ग्रिल करून सर्व्ह करा.

मसाला पॉपकॉर्न

अशाप्रकारे पॉपकॉर्न बनवण्यासाठी सर्वात आधी मायक्रोवेव्हमध्ये पॉपकॉर्न घेऊन एका भांड्यात काढा. आता एका वेगळ्या भांड्यात लिंबाचा रस, ठेचलेली मिरपूड आणि आंबा पावडर एकत्र करून त्यात पॉपकॉर्न टाका आणि मिक्स करा. पॉपकॉर्नला कोथिंबिरीने सजवा आणि सर्व्ह करा.

खांडवी

खांडवी बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात दही आणि पाणी टाकून चांगले फेटून घ्या. आता एका नॉनस्टिक पॅनमध्ये बेसन, पातळ दही, लिंबाचा रस, हळद, आले आणि हिरवी मिरची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून १० मिनिटे शिजवा. यानंतर, हे मिश्रण एका उलट्या भांड्यात ठेवून चमच्याच्या मदतीने पसरवा आणि थंड झाल्यावर रोल करा. शेवटी, मोहरी आणि चिमूटभर हिंग कोरडी भाजून खांडवीवर किसलेले खोबरे आणि हिरवी कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

 

WhatsApp channel

विभाग