रविवारी २३ एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा होत असताना, अॅमेझॉन डॉट इन ने आपली वर्षभर चालणारी #GiftABook मोहीम जाहीर केली. भारतातील पुस्तक वाचन आणि भेटवस्तू देण्याच्या संस्कृतीला प्रेरणा देण्याच्या उद्देशाने, मोहिमेने भेटवस्तू देण्याच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित केले आहे. विशेष उद्देश्याने तयार केलेल्या भेटवस्तू बुक स्टोअर फ्रंटवर ग्राहक अनेक प्रकारच्या आकर्षक ऑफर आणि डीलसह त्यांच्या पिढीसाठी योग्य आणि त्यांच्या वयोगटातील पुस्तके शोधू शकतात. अमेझॉन डॉट इन चा हा उपक्रम ‘मेक इंडिया रीड’ या त्यांच्या चालू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे.
मोहिमेला सुरुवात करण्यासाठी, या वर्षाच्या सुरुवातीला एक डिजिटल व्हिडीओ प्रदर्शीत करण्यात आला होता ज्यात एका तरुण मुलीचा प्रवास कॅप्चर केलेला आहे आणि तिच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर तिला भेटवस्तू दिलेल्या पुस्तकांचा प्रभाव त्यात दाखवला आहे ज्यामुळे तिच्या कथेला एक पूर्णरूप मिळण्यास मदत झालेली आहे. व्हिडीओ या गोष्टीवर भर देतो की पुस्तके ही अशी भेट आहे जी कधीही फॅशनच्या बाहेर जात नाही आणि वाचनाचे अनेक फायद्यांवर त्यात प्रकाश टाकला आहे, जसे की जिज्ञासा वाढवणे, कल्पनाशक्ती विकसित करणे, नवीन कल्पना निर्माण करणे आणि चारित्र्य घडवणे.
अॅमेझॉन इंडियाचे मीडिया संचालक राजेश्री गैन म्हणाल्या, “वाचकांचे राष्ट्र निर्माण करण्यात आम्ही योगदान देण्यासाठी वचनबद्ध आहोत. वाचनामुळे कल्पनाशक्ती विकसित होते, जिज्ञासा वाढते, नवीन कल्पना निर्माण होतात आणि चारित्र्य निर्माण होते. पुस्तके ही उत्तम भेटवस्तू असण्याची अनेक कारणांपैकी ही काही कारणे आहेत. अॅमेझॉन वर आम्हाला पुस्तकांची आवड आहे आणि आम्ही भारताला अधिक वाचक बनवण्याच्या आमच्या दृष्टीकोनाला जिवंत करण्यासाठी विक्रेते, प्रकाशक आणि लेखकांसोबत काम करत आहोत. आमची मोहीम #GiftABook वाचनाची आवड पसरवण्याच्या या प्रदीर्घ प्रवासातील एक छोटेसे पाऊल आहे. स्वत:साठी आणि त्यांच्या प्रियजनांसाठी एखादे पुस्तक निवडण्यासाठी विविध शैली आणि भाषांमधील लाखो शीर्षके शोधण्यासाठी ग्राहक आमच्या वेबसाइट आणि अॅपला भेट देऊ शकतात.”
पारितोषीक विजेत्या लेखीका सुधा मुर्ती म्हणाल्या, “तुम्ही पुस्तक विकत घेतल्यास, तुम्ही एक प्रकारे ज्ञान विकत घेत आहात. पुस्तके तुम्हाला आराम, ज्ञान आणि एक प्रकारची लवचिकता देतात- जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही वाचू शकता. ती एक अप्रतिम भेट आहे. मी प्रत्येक आईला नेहमी सांगते की तुमच्या मुलांनी योग्य वयात त्यांचा वेळ योग्य मार्गाने घालवायचा असेल तर त्यांना वाचनाची सवय लागली पाहिजे आणि वाचण्यासाठी तुमच्याकडे पुस्तके असायला हवीत. माझा विश्वास आहे की ज्यांच्याकडे पुस्तके आहेत ते सर्वात श्रीमंत लोक आहेत कारण त्यांच्याकडे ज्ञानाचा खजिना आहे. म्हणुनच, कृपया एक पुस्तक वाचा, कृपया एक पुस्तक खरेदी करा.”
या जागतिक पुस्तक दिनानिमित्त, ग्राहकांना १६ ते २५ एप्रिल २०२३ दरम्यान अॅमेझॉन डॉट इन वर खास तयार केलेल्या स्टोअर फ्रंटवर हिंदी, तमिळ, मराठी, मल्याळम, गुजराती आणि इतर अनेक भारतीय भाषांमधील ई-पुस्तके, ऑडिओ पुस्तके आणि प्रत्यक्ष पुस्तके देखील मिळतील.