मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'पोहे खरेदी कारण्याइतकेही पैसे नसायचे...' , बालपणीच्या आठवणीने वैभव मांगले भावुक

'पोहे खरेदी कारण्याइतकेही पैसे नसायचे...' , बालपणीच्या आठवणीने वैभव मांगले भावुक

Payal Shekhar Naik HT Marathi
May 10, 2022 12:36 PM IST

नाटक, मालिका आणि चित्रपट ही क्षेत्र गाजवणाऱ्या वैभवने बालपणी मात्र हलाखीचे दिवस काढले आहेत.

वैभव मांगले
वैभव मांगले

मराठी चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून वैभव मांगले लोकप्रिय आहे. वैभव आपल्या अभिनयाने भल्याभल्या अभिनेत्यांना टक्कर देतो. आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक हिट चित्रपटात काम करणाऱ्या वैभवचं प्रेक्षकही कौतुक करतात. नाटक, मालिका आणि चित्रपट ही क्षेत्र गाजवणाऱ्या वैभवने बालपणी मात्र हलाखीचे दिवस काढले आहेत. नुकत्याच एका कार्यक्रमात वैभवने त्याच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. आपण एका सर्वसाधारण घरातून आलो अन तेव्हा घरात वेगळं काही खायला घ्यायचं तरी खूप विचार करावा लागायचा असं वैभवने सांगितलं.

ट्रेंडिंग न्यूज

वैभवने नुकतीच झी मराठी वाहिनीवरील 'किचन कलाकार' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. कार्यक्रमात वैभवसोबत संस्कृती बालगुडे आणि अन्विता फलटणकर देखील होत्या. या कार्यक्रमात त्याची साथ द्यायला वैभवची आईदेखील सोबत आली होती. प्रशांत दामले यांनी वैभवला त्या भागाचा विजेता घोषित केल्यावर वैभवने त्याच्या बालपणीची आठवण सांगितली. वैभव म्हणाला, 'आम्ही काही फार सुखवस्तू घरातले नव्हतो. माझ्या आईने खूप सहन केलंय. आमची आर्थिक स्थिती फारशी ठीक नव्हती. मला लहानपणापासूनच कांदापोहे खायची फार आवड. पण तेव्हा आमच्याकडे पोहे घेण्याइतकेही पैसे नसायचे. मग फक्त माझ्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी माझी आई माझ्या वाढदिवसाच्या दिवशी कांदेपोहे बनवायची. ती मला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायची. तिची ती धडपड मला कळायची.'

वैभवने हा किस्सा सांगताच तिथे उपस्थित सगळ्यांचेच डोळे पाणावले होते. वैभव सध्या 'अलबत्या गलबत्या' नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. या नाटकात तो 'चेटकिणीची भूमिका साकारतो आहे.

IPL_Entry_Point