मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viju Khote Birth Anniversary: ‘शोले’ चित्रपटातील ‘कालिया’साठी विजू खोटे यांना मिळाली अवघी ‘इतकी’ फी!

Viju Khote Birth Anniversary: ‘शोले’ चित्रपटातील ‘कालिया’साठी विजू खोटे यांना मिळाली अवघी ‘इतकी’ फी!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 17, 2022 07:46 AM IST

Viju Khote Birthday : विजू खोटे यांनी हिंदी-मराठीतील अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. मात्र, ते ‘शोले’ चित्रपटातील भूमिकेमुळे अधिक लक्षात राहिले.

Viju Khote
Viju Khote

Viju Khote Birthday : आपल्या अभिनयाने मराठीच नव्हे, तर बॉलिवूड इंडस्ट्री गाजवणारे अभिनेते म्हणजे विजू खोटे. दमदार अभिनय, विनोदाची जाण आणि जबरदस्त संवादफेक या शैलींमुळे विजू खोटे यांनी साकारलेलं प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनामनात रुजलं. आज (१७ डिसेंबर) विजू खोटे यांचा जन्मदिन. आज जरी ते आपल्यात नसले, तरी ते त्यांच्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात कायम अजरामर आहेत. विजू खोटे यांचा जन्म १७ डिसेंबर १९४१ रोजी मुंबईत झाला होता. त्यांना अभिनयाचं बाळकडू कुटुंबातूनच मिळालं होतं.

ट्रेंडिंग न्यूज

विजू खोटे यांना विनोदी भूमिका साकारणं अधिक आवडायचं. विजू खोटे यांचं संपूर्ण कुटुंब मनोरंजन विश्वात सक्रिय होतं. विजू खोटे यांचे वडील नंदू खोटे हे रंगभूमीवरचे प्रसिद्ध अभिनेते होते. तर, त्यांची आत्या अभिनेत्री दुर्गा खोटे हे मनोरंजन विश्वातील मोठं नाव होतं. विजू खोटे यांच्याप्रमाणेच त्यांची बहीण शुभा खोटे या देखील अभिनेत्री आहेत. ‘मालिक’ या चित्रपटातून डेब्यू करणाऱ्या विजू खोटे यांनी हिंदी-मराठीतील अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. मात्र, ते ‘शोले’ चित्रपटातील भूमिकेमुळे अधिक लक्षात राहिले.

‘शोले’ या चित्रपटामध्ये विजू खोटे यांनी ‘कालिया’ ही भूमिका साकारली होती. ‘कालिया’ हे या चित्रपटातलं अवघं ७ मिनिटांचं पात्र होतं. ‘गब्बर’च्या टोळीतील त्यांचा डाकू लूकही प्रसिद्ध झाला होता. इंडस्ट्रीत जेव्हा जेव्हा गब्बरची चर्चा होते, तेव्हा कालियाचे नावही घेतले जाते. या ७ मिनिटांच्या भूमिकेमुळे विजू खोटे यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली होती. या छोट्याशा भूमिकेसाठी विजू खोटे यांना अवघं २५०० रुपयांचं मानधन देण्यात आलं होतं.

‘शोले’ हा चित्रपट बनवण्यासाठी रमेश सिप्पी यांनी आपले वडील जीपी सिप्पी यांच्याकडून ३ कोटी रुपये घेतले होते. यातील २० लाखांच्या खर्चात ‘शोले’च्या संपूर्ण कास्टचे मानधन देण्यात आले होते. बाकीचा संपूर्ण खर्च हा चित्रपटाच्या मेकिंग बजेटवर लावण्यात आला होता. त्यामुळे विजू खोटे यांना या ७ मिनिटांच्या भूमिकेसाठी २५०० रुपये इतके मानधन देण्यात आले होते.

IPL_Entry_Point