बॉलिवूड अभिनेता विकी कौशल याची चाहत्यांमधील क्रेझ सगळ्यांनीच पाहिली आहे. त्याची अभिनयाची आवड आणि पात्र निवडण्याची स्टाईल देखील सगळ्यांना माहित झाली आहे. ‘मसान’मधील ‘दीपक’ असो, किंवा ‘उरी’मधील आर्मी कॅप्टन, विकी प्रत्येक पात्रामध्ये अक्षरशः प्राण फुंकतो. विकी कौशलच्या अभिनयासोबतच त्याच्या लूकचीही खूप क्रेझ आहे. विकी कौशल सध्या त्याच्या आगामी 'छावा' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. विकी कौशल या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाच्या सेटवरून त्याचे काही फोटो लीक झाले आहेत.
विकी कौशलचे ‘छत्रपती संभाजी महाराज’ या भूमिकेतील फोटोही सोशल मीडियावर लीक झाले आहेत. हे फोटो पाहून चाहतेही खूप खुश झाले आहेत. विकी कौशल या चित्रपटात एक मोठी व्यक्तिरेखा साकारत आहे. या लीक झालेल्या फोटोंमध्ये विकी कौशलने योद्ध्याची वेशभूषा केली आहे. विकी कौशलने धोती आणि कोट परिधान केला आहे. यासोबत कमरेला लाल कपडा बांधला आहे आणि गळ्यात रुद्राक्ष माळा घातल्या आहेत. पातळ आणि बारीक दाढी असलेला विकी कौशल अगदी मराठा योद्ध्यासारखा दिसतो आहे. विकी कौशलच्या या फोटोंवर चाहत्यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
विकी कौशलचे हे फोटोज व्हायरल होताच लोकांनी आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. विकीचे हे फोटो पाहून चाहते आनंदाने उड्या मारत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. विकी कौशलच्या संभाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना चाहत्यांनी म्हटले की, 'विकी कौशल हा या पिढीतील सर्वात प्रतिभावान कलाकार आहे.' यासोबतच इतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी अशाच प्रकारच्या कमेंट केल्या आहेत. विकी कौशलला प्रत्येक पात्रात अभिनयाने कसा रंग भरायचा हे माहित आहे. लोकांनीही विकी कौशलच्या लूकचे खूप कौतुक केले आहे.
विक्की कौशलने त्याच्या कारकिर्दीत अनेक भूमिकांमध्ये याआधीही दमदार अभिनयाचा जलवा दाखवून प्रेक्षकांची माने जिंकून घेतली आहेत. ‘मसान’मध्ये विकी कौशलने एका विद्यार्थ्याची भूमिका साकारली होती. लोकांनी या व्यक्तिरेखेचे खूप कौतुक केले होते. यासोबतच विक्की कौशलच्या ‘रमन राघव’ या व्यक्तिरेखेचेही खूप कौतुक झाले होते. यासोबतच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सॅम माणिकशॉ’ या चित्रपटातूनही विकी कौशलने खूप वाहवा मिळवली. विकी कौशलची फॅन फॉलोइंगही जोरदार आहे. लक्ष्मण उतेकर ‘छावा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट याच वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विकी कौशलसोबत रश्मिका मंदाना देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
संबंधित बातम्या