मराठी बातम्या  /  Entertainment  /  Swara Bhaskar Talked About Pakistani Lehenga

Swara Bhaskar: पाकिस्तानी लेहंगा भारतात आणला कसा? स्वरा भास्करने दिली माहिती

स्वरा भास्कर
स्वरा भास्कर
Aarti Vilas Borade • HT Marathi
Mar 21, 2023 06:20 PM IST

Swara Bhaskar Wedding: स्वरा भास्करसाठी फहादच्या कुटुंबीयांनी पाकिस्तानमधील प्रसिद्ध डिझायनरकडून लेहंगा मागवला होता. तो लेहंगा भारतात आला कसा? याबाबत स्वराने स्वत: माहिती दिली आहे.

देशातील सामाजिक व राजकीय घडामोडींवरील रोखठोक भूमिका आणि बेधडक मतांमुळं सातत्यानं चर्चेत असणारी अभिनेत्री स्वरा भास्कर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नातील फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तुम्हाला माहितीये का स्वराच्या लग्नातील लेहंगा हा पाकिस्तानवरुन पाठवण्यात आला होता. स्वराने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. त्यानंतर अनेकांना तो लेहंगा भारतात आला कसा? असा प्रश्न पडला होता. आता स्वत: स्वराने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

स्वराने ट्विटर अकाऊंटवर रिसेप्शनमधील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने पाकिस्तानी लेहेंगा लाहोरवरुन दुबईला पोहचला त्यानंतर दुबईहून मुंबईत आणि मुंबईवरून तो बरेलीत आणण्यात आला असे म्हटले आहे.

दोन दिवसांपूर्वी स्वराच्या लग्नातील सगळे विधी झाले असून तिची पाठवणी झाली आहे. सध्या स्वरा फहदच्या बरेली येथील घरी आहे. रविवारी स्वरासाठी एक शानदार दावत-ए-वलीमा ठेवण्यात आला होता. इतकच नव्हे तर फहदच्या कुटुंबीयांनी स्वरासाठी पाकिस्तानमधील एका डिझायनरकडून लेहंगा मागावला होता. स्वराने स्वत: सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली. त्यानंतर तो कसा भारतात आणण्यात आला याची देखील तिने माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वी स्वराने सोशल मीडियावर पोस्ट करत कोर्टात लग्न केल्याची माहिती दिली होती. तिच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला होता. स्वराचा पती फहाद हा समाजवादी पक्षाच्या युवाजन सभेचा राज्याचा अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ता आहे. २०२० साली झालेल्या एका आंदोलनाच्या दरम्यान दोघांची भेट झाली होती.

WhatsApp channel

विभाग