मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shyamchi Aai: बहुप्रतिक्षित 'श्यामची आई' चित्रपटाचा टीझर पाहिलात का?

Shyamchi Aai: बहुप्रतिक्षित 'श्यामची आई' चित्रपटाचा टीझर पाहिलात का?

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 09, 2023 04:53 PM IST

Shyamchi Aai Teaser : दिवाळीच्या मुहूर्तावर १० नोव्हेंबर,२०२३ रोजी 'श्यामची आई' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shyamchi Aai
Shyamchi Aai

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय डहाकेचा आगामी चित्रपट 'श्यामची आई' चर्चेत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'श्यामची आई' या चित्रपटात ओम भूतकर यांनी साने गुरुजींची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे तर सोबत गौरी देशपांडे, बाल कलाकार शर्व गाडगीळ,संदीप पाठक, ज्योती चांदेकर, सारंग साठ्ये, उर्मिला जगताप, अक्षया गुरव, दिशा काटकर, मयूर मोरे , गंधार जोशी, अनिकेत सागवेकर ही मोठी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे. अशातच चित्रपटाचा टीझर हा लक्षवेधी ठरत आहे.
वाचा: तुम्हालाही येते का बालवयातील पहिल्या प्रेमाची आठवण? मग, ‘आत्मपॅम्फ्लेट’चा प्रवास कराच!

नुकताच 'श्यामची आई' चित्रपटाचा १ मिनिटांच्या टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझर पाहाता हा चित्रपट कृष्णधवल चित्रपटांच्या गोल्डन एरात खोडकर श्याम आणि त्याची मायेने शिस्त लावणारी आई दाखवणारा आहेत. चित्रपटाचा टीजर पहिलात तर कैक वर्षांपूर्वीचा काळ डोळ्यासमोर तंतोतंत उभा राहील. चित्रपटातील कलाकारांचे लूक्स, सेट, संवाद ते अगदी संगीत अशा साऱ्या गोष्टींना गोल्डन टच दिलेला पदोपदी जाणवेल.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय सुनील डहाके दिग्दर्शित 'श्यामची आई' या चित्रपटाचा टिजर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. हा टिजर रिलीज झाल्यानंतर चित्रपटाविषयीची उत्सुकता मात्र जोरदार वाढली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर १० नोव्हेंबर,२०२३ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग