मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shriya Pilgaonkar: श्रिया पिळगावकर दिसणार हटके भूमिकेत; ‘ताजा खबर’मध्ये साकारणार ‘हे’ पात्र

Shriya Pilgaonkar: श्रिया पिळगावकर दिसणार हटके भूमिकेत; ‘ताजा खबर’मध्ये साकारणार ‘हे’ पात्र

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 13, 2022 08:27 AM IST

Shriya Pilgaonkar To Play A Sex Worker: श्रिया पिळगावकर 'गिल्टी माइंड्स' आणि 'द ब्रोकन न्यूज' या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यानंतर आता ती ‘ताजा खबर’ घेऊन पुन्हा एकदा मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे.

Shriya Pilgaonkar
Shriya Pilgaonkar

Shriya Pilgaonkar: मराठी मनोरंजन विश्वासह, बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने धुमाकूळ घालणारे अभिनेते सचिन पिळगावकर यांची लेक श्रिया देखील मनोरंजन विश्वात सक्रिय आहे. आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत श्रिया पिळगावकर हिने देखील फिली विश्वात स्वतःचं हक्काच स्थान निर्माण केलं आहे. ‘एकुलती एक’, ‘फॅन’ या सारख्या चित्रपटांमध्ये झाल्क्लेली श्रिया ओटीटी विश्वात मात्र धुमाकूळ घालतेय. ‘मिर्झापूर’, 'गिल्टी माइंड्स' आणि 'द ब्रोकन न्यूज' या सारख्या वेब सीरिजमधून श्रियाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता श्रिया तिच्या आगामी सीरिजमध्ये एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

या वर्षी श्रिया पिळगावकर 'गिल्टी माइंड्स' आणि 'द ब्रोकन न्यूज' या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यानंतर आता ती ‘ताजा खबर’ घेऊन पुन्हा एकदा मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. आगामी ‘ताजा खबर’ या वेब सीरिजमध्ये श्रिया पिळगावकर एका देहविक्री करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘ताजा खबर’ वेब सीरिजमधील तिच्या या पात्राचे नाव ‘मधू’ असे असणार आहे.

‘ताजा खबर’मध्ये ‘मधू साकारण्यासाठी श्रिया देखील अतिशय उत्सुक आहे. या आधी तिने कधी अशा प्रकारची व्यक्तिरेखा साकारली नव्हती. यामुळेच प्रेक्षक देखील श्रियाला एका वेगळं आव्हान स्वीकारताना पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना श्रिया म्हणाली की, ‘ताझा खबर सारख्या वेब सीरिजचा एक भाग बनून मला खूप आनंद झाला आहे. या सीरिजमध्ये मला एक पूर्णपणे वेगळा लूक दाखवायला मिळाला आहे, जो मी या आधी कधीच केला नव्हता. एक अभिनेत्री म्हणून हा माझ्यासाठी नवीन अनुभव होता. या सीरिजमध्ये काम करताना खूप आनंद होतोय.’

श्रिया आपल्या या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना पुढे म्हणाली की, ‘या आधी मी 'गिल्टी माइंड्स'मध्ये वकील आणि 'द ब्रोकन न्यूज'मध्ये बातमीदार म्हणून झळकले होते. मात्र, ताजा खबर ही वेब सीरिज कॉमेडी-ड्रामा असणार आहे. यात मी भुवन बामसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. यात माझ्या लूकवर विशेष मेहनत घेण्यात आली आहे. मी साकारात असलेली मधू खूप हळवी पण उत्साही आहे.’ लवकरच, ‘ताजा खबर’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

IPL_Entry_Point