मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shiv Thakare : शिव ठाकरेच्या हातून निसटले दोन मोठे चित्रपट! कारण ऐकून व्हाल हैराण

Shiv Thakare : शिव ठाकरेच्या हातून निसटले दोन मोठे चित्रपट! कारण ऐकून व्हाल हैराण

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 24, 2023 04:00 PM IST

Shiv Thakare quit 2 movie project: बिग बॉस संपला असला तरी, या शोने शिव ठाकरेला खूप प्रसिद्धी मिळवून दिली आहे. मात्र, आता त्याच्या हातून दोन मोठे चित्रपट निसटल्याचे म्हटले जात आहे.

Shiv Thakare
Shiv Thakare

Shiv Thakare quit 2 movie project: ‘बिग बॉस १६’च्या माध्यमातून लोकांच्या हृदयात आपले खास स्थान निर्माण करणारा शिव ठाकरे शो संपल्यानंतरही चर्चेत आहे. त्याच्याबद्दल रोज काही ना काही अपडेट समोर येत असतात. सलमान खानच्या ‘बिग बॉस १६’ या रिअॅलिटी शोनंतर 'खतरों के खिलाडी' आणि 'लॉक अप २'साठी शिवला विचारणा झाली आहे. मात्र, आता त्याच्या हातून दोन मोठे चित्रपट निसटल्याचे म्हटले जात आहे. याचे कारण देखील आता समोर आले आहे. बिग बॉस संपला असला तरी, या शोने शिव ठाकरेला खूप प्रसिद्धी मिळवून दिली आहे.

एकापाठोपाठ एक असे तीन रिअॅलिटी शो केल्यानंतर आता पुन्हा एकदा शिव ठाकरे स्टंटवर आधारित शो ‘खतरों के खिलाडी’च्या नव्या सीझनमध्ये दिणार आहे. शिवने देखील याचा खुलासा केला आहे की, तो रोहित शेट्टीच्या शोमध्ये झळकणार आहे. मात्र, हा शो करण्यासाठी शिवला मोठी किंमत मोजावी लागली आहे. या शोसाठी शिव ठाकरे याने दोन मोठ्या मराठी चित्रपटांची ऑफर नाकारली आहे. आता त्याने असे का केले, याचे उत्तर देखील त्याने एका मुलाखतीत दिले आहे. शिव नेहमीच म्हणतो की, आपल्याला मोठा अभिनेता व्हायचे आहे. असे असताना त्याने चित्रपट नाकारल्याने आता चाहते बुचकळ्यात पडले आहेत.

Varun Dhawan Love Story: बचपन क्या प्यार... चारवेळा नकार पचवून वरुण धवन मिळवला होता नताशाचा होकार!

या प्रश्नाला उत्तर देताना शिव ठाकरे म्हणाला की, त्याला या चित्रपटांची ऑफर आली होती, मात्र त्याने ती नाकारली आहे. या दोन्ही चित्रपटांचे शूटिंग एप्रिलपासून सुरू होणार होते आणि ते मे महिन्याच्या अखेरीस संपणार होते. पण याआधीच त्याने 'खतरों के खिलाडी' हा शो साईन केला होता. तर, या सगळ्याच प्रोजेक्ट्सच्या तारखा एकत्र आल्याने त्याला हा मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. आधीच या शोसाठी डेट्स दिल्याने, शिव ठाकरे याने नवे चित्रपट नाकारले आहेत.

शिव ठाकरे हा प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि कोरिओग्राफर देखील आहे. त्याचा जन्म अमरावती येथे १९८९ साली झाला. ‘एमटीव्ही रोडीज रायझिंग’मधून तो पहिल्यांदा टीव्हीवर झळकला होता. तर, ‘बिग बॉस हिंदी’मध्ये येण्यापूर्वी तो ‘बिग बॉस मराठी’मध्येही दिसला होता. ‘मराठी बिग बॉस’ या शोच्या दुसऱ्या सीझनचा तो विजेता ठरला आहे.

IPL_Entry_Point

विभाग