मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dream Girl 2 Postponed: आयुष्मानच्या ‘ड्रीम गर्ल २’च्या प्रदर्शनाला लागला ब्रेक! नेमकं कारण तरी काय?

Dream Girl 2 Postponed: आयुष्मानच्या ‘ड्रीम गर्ल २’च्या प्रदर्शनाला लागला ब्रेक! नेमकं कारण तरी काय?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 24, 2023 01:41 PM IST

Dream Girl 2 release Postponed: ‘ड्रीम गर्ल’ पूजाला भेटण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे. खुद्द आयुष्मान खुरानाने ही माहिती दिली आहे.

Dream Girl 2
Dream Girl 2

Dream Girl 2 release Postponed: बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याच्या ‘ड्रीम गर्ल २’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. मात्र, आता आयुष्मानच्या चाहत्यांना आता आणखी काळ वाट पाहावी लागणार आहे. ‘ड्रीम गर्ल २’च्या प्रदर्शनाची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. स्वतः आयुष्मान खुराना याने याबद्दलची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. सध्या आयुष्मान या चित्रपटाचे वेगवेगळे टीझर सोशल मीडियावर शेअर करत आहे.

नुकतेच ‘ड्रीम गर्ल’ पूजाने 'पठाण'च्या हृदयाची घंटी वाजवून आणि 'टायगर'ला आपला आवाज ऐकवून सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. पण, आजपर्यंत तिने आपला चेहरा दाखवलेला नाही. तिचा चेहरा बघण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. मात्र, आता ही प्रतीक्षा अजून थोडी लांबणार आहे. आयुष्मान खुरानाचा आगामी चित्रपट 'ड्रीम गर्ल २' ची रिलीज पुढे ढकलण्यात आली आहे.

Ruslaan Movie: आयुष शर्माचा नवा चित्रपट वादात; ‘रुसलान’च्या निर्मात्यांना मिळाली कायदेशीर नोटीस!

आता पूजाला भेटण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे. खुद्द आयुष्मान खुरानाने ही माहिती दिली आहे. अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हॉईस व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये चाहत्यांसाठी खास संदेश देण्यात आला आहे. आयुष्मान खुरानाने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये ‘ड्रीम गर्ल’ असे म्हणताना दिसत आहे की, ‘चार वर्षांनंतर पुन्हा एकदा तुमच्या हृदयाचा फोन वाजणार आहे.’ ‘ड्रीम गर्ल २’ची रिलीज डेट आता बदलली आहे. आयुष्मान खुराना स्टारर ‘ड्रीम गर्ल २’ या आधी ७ जुलै २०२३ रोजी रिलीज होणार होता. पण, आता हा चित्रपट २५ ऑगस्ट २०२३ला प्रदर्शित होणार आहे.

राज शांडिल्य दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने केली आहे. ‘ड्रीम गर्ल २’मध्ये नुसरत भरुचा, आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर, ‘ड्रीम गर्ल २’ हा चित्रपट यावर्षी २५ ऑगस्ट २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग