मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: पठाण पाहताना चाहत्यांनी फोडले फटाके अन्...; पुढे काय झाले पाहा व्हिडीओ

Viral Video: पठाण पाहताना चाहत्यांनी फोडले फटाके अन्...; पुढे काय झाले पाहा व्हिडीओ

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 29, 2023 10:48 AM IST

Pathaan: शाहरुख खानच्या चाहत्यांनी चित्रपट सुरु असताना फटाके फोडल्यामुळे गोंधळ झाला. सध्या थिएटरमधील हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.

पठाण
पठाण (HT)

सध्या शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाती क्रेझ संपूर्ण जगभरात पाहायला मिळते. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जणू काही धूमाकूळ घातला आहे. चार दिवसात चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आता थिएटरमधील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

शाहरुखचे जगभरातील चाहते ‘पठाण’ चित्रपट पाहून भारावले आहेत. त्याच्या जबरा फॅननी काही ठिकाणी संपूर्ण थिएटरच बुक केले तर काहींनी चित्रपटाची फुकट तिकिटे वाटल्याचे समोर आले. आता तर ‘पठाण’ चित्रपट सुरू असताना चाहत्यांनी चित्रपटगृहामध्येच फटाके फोडले आहेत. त्यांचा फटाके फोडतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
वाचा: बिग बॉसच्या घरातून या स्पर्धकाला पडावे लागले बाहेर, नाव वाचून बसेल धक्का

‘पठाण’च्या यशानंतर शाहरुखने #AskSRK ट्विटर सेशन घेतले. या हॅशटॅगच्या माध्यमातून चाहत्यांनी शाहरुखला अनेक प्रश्न विचारले. त्यावेळी एका चाहत्याने थिएटरमध्ये पठाण पाहात असतानाचा फटाके फोडल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. पण हे कोणत्या चित्रपटगृहामध्ये घडले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

‘पठाण’ या चित्रपटातून शाहरुख खान याने ४ वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. चार वर्षांच्या ब्रेकनंतरही शाहरुखची जादू तसूभरही कमी झालेली नाही. पठाण या चित्रपटाने चार दिवसात बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटातून शाहरुखने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. तर, अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ग्लॅमरस स्टाईलनेही धुमाकूळ घातला आहे. जॉन अब्राहम देखील खलनायकाच्या भूमिकेत हिट ठरल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर सलमान खानच्या कॅमिओनेही या चित्रपटाला चार चाँद लावले आहेत.

IPL_Entry_Point

विभाग