मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss: बिग बॉसच्या घरातून या स्पर्धकाला पडावे लागले बाहेर, नाव वाचून बसेल धक्का

Bigg Boss: बिग बॉसच्या घरातून या स्पर्धकाला पडावे लागले बाहेर, नाव वाचून बसेल धक्का

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 28, 2023 10:36 AM IST

Bigg Boss 16: प्रियांका चहर चौधरी, शिव ठाकरे, शालिन भानौत टीना दत्ता हे स्पर्धक घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट होते.

बिग बॉस
बिग बॉस (HT)

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. सध्या बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेला बिग बॉसचा १६ सिझन चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात सतत होणारे राडे, वादविवाद, प्रेम, मैत्रीने या सर्वामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन झाले आहे. आता लवकरच या शोचा अंतिम सोहळा पार पडणार आहे. पण अचानक बिग बॉसच्या घरात एलिमिनेशन झाले. ज्या स्पर्धकाला घरातून बाहेर पडावे लागले त्याचे नाव ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

बिग बॉस १६ सुरु होऊन तीन महिने उलटून गेले आहेत. दरवर्षी हा शो तीन महिन्यांचाच असतो. मात्र वाढती टीआरपी आणि प्रेक्षकांची पसंती यामुळे यंदाचा सीजन आणखी एक महिना वाढविण्यात आला आहे. दरम्यान आता शोचा शेवटचा टप्पा जवळ आला आहे. दरम्यान, आता एका स्पर्धकाची शोमधून एक्झिट झाल्याची बातमी समोर आली आहे.
वाचा: बिग बॉस १६मधील 'हा' स्पर्धक दिसणार बिग ब्रदर UKमध्ये

या आठवड्यात प्रियांका चहर चौधरी, शिव ठाकरे, शालिन भानौत टीना दत्ता हे स्पर्धक घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट होते. समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिग बॉस १६च्या घरातून अभिनेत्री टीन दत्त एक्झिट घेणार आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

IPL_Entry_Point

विभाग