मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shah Rukh Khan: ‘दुआ, प्रार्थना आणि प्रेयर...’; ‘त्या’ खास चित्रपटगृहांसाठी शाहरुखने लिहिली पोस्ट!
Pathaan
Pathaan

Shah Rukh Khan: ‘दुआ, प्रार्थना आणि प्रेयर...’; ‘त्या’ खास चित्रपटगृहांसाठी शाहरुखने लिहिली पोस्ट!

25 January 2023, 9:59 ISTHarshada Bhirvandekar

Shah Rukh Khan Film Pathaan: ‘पठाण’ या चित्रपटामुळे काही बंद पडलेली सिंगल स्क्रीन थिएटर्स पुन्हा सुरू होणार आहेत.

Shah Rukh Khan Film Pathaan: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा ‘पठाण’ हा बिग बजेट चित्रपट आज (२५ जानेवारी) मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची प्रेक्षक अतिशय आतुरतेने वाट बघत होते. ‘पठाण’ हा चित्रपट अनेक कारणांमुळे खास ठरणार आहे. या चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तर, काही ठिकाणी हा चित्रपट सकाळी ६ वाजता रिलीज करण्यात आला आहे. याशिवाय या चित्रपटामुळे काही बंद पडलेली सिंगल स्क्रीन थिएटर्स पुन्हा सुरू होणार आहेत. यानिमित्ताने शाहरुख खान याने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

गेली दोन वर्ष कोरोना महामारीने सगळ्याच क्षेत्रांचे कंबरडे मोडले होते. यात सगळ्यात मोठा फटका बसला तो सिंगल स्क्रीन थिएटर्सला. अनेक महिन्यांपासून बंद पडलेली ही चित्रपटगृहे अद्यापपर्यंत बंदच होती. मात्र, शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे ही चित्रपटगृहे पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. ‘पठाण’ची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून आता बंद पडलेली सिंगल स्क्रीन थिएटर्स सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या सिंगल स्क्रीन थिएटर्ससाठी शाहरुख खान याने एक खास पोस्ट लिहिली आहे. यात शाहरुख खान याने त्याच्या बालपणीची आठवण शेअर केली आहे. शाहरुख खान याने लिहिले की, ‘लहानपणी सगळे चित्रपट सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये पाहिले आहेत. त्याची एक वेगळीच मजा असते. दुआ, प्रार्थना आणि प्रेयर करतो की, मला आणि सगळ्यांना यश मिळो. री ओपनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा..’

शाहरुख खानच्या या चित्रपटामुळे अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्स पुन्हा एकदा प्रेक्षकांनी हाऊसफुल होणार आहेत. काही सिंगल स्क्रीन चित्रपटगृहे गेल्या काही काळापासून बंद पडली होती. मात्र, 'पठाण'ची क्रेझ पाहून, आता ही सिंगल स्क्रीन चित्रपटगृहे पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत.